By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 19:10 IST
1 / 9आजच्या धावपळीच्या जीवनात बहुतेक लोक त्यांचा बराचसा वेळ खुर्चीवर बसून घालवतात. तासन्तास एकाच ठिकाणी बसल्याने पाठ आणि मानदुखीसारख्या समस्या निर्माण होतातच, पण त्यासोबतच आपलं वजनही हळहळू वाढतं. 2 / 9कामामुळे अनेकांना जिमला जाण्यासाठी वेळच मिळत नाही, डाएट प्लॅन फॉलो करणं देखील कठीण होते आणि लठ्ठपणा वाढतो, जो नंतर चिंतेचे कारण ठरतो. शरीरावर त्याचा घातक परिणाम होतो.3 / 9सतत बसल्यामुळे वजन वाढणं, कंबरेभोवती चरबी जमा होणं, थकवा आणि मेटाबॉलिज्म स्लो होणं ही सामान्य समस्या बनली आहे. अशा परिस्थितीत लोक विचार करतात की जिम किंवा व्यायामाशिवाय वजन कसं कमी करावं? याचं उत्तर म्हणजे ३०-३०-३० नियम.4 / 9हा नियम फिटनेसच्या जगात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. जिमला न जाता, कोणत्याही खर्चाशिवाय वजन कमी करण्यासाठी हे सोपं तर आहेच पण प्रभावीही ठरत आहे.5 / 9दिवसाच्या सुरुवातीला प्रोटीनयुक्त नाश्ता केल्याने शरीराचं मेटाबॉलिज्म एक्टिव्ह होतं आणि पोट बराच काळ भरलेलं राहतं. यामुळे पुन्हा पुन्हा काहीतरी खाण्याची इच्छा कमी होते. अंडी, दूध, मूग डाळ चिला, पीनट बटर, दही असे पर्याय यामध्ये उपयुक्त आहेत.6 / 9जरी तुम्ही जिममध्ये जात नसलात तरी दररोज ३० मिनिटं चालणे किंवा पायऱ्या चढणं, घरातील कामे करणं, योगा किंवा स्ट्रेचिंग केल्याने तुमचे शरीर एक्टिव्ह राहतं आणि फॅट बर्न होतात7 / 9जेवल्यानंतर लगेच खुर्चीवर किंवा बेडवर बसल्याने मेटाबॉलिज्मवर वाईट परिणाम होतो. जेवल्यानंतर ३० मिनिटं चालल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीरात फॅट जमा होत नाहीत.8 / 9हा नियम वजन कमी करण्यासोबत योग्य आहार, व्यायामाचा अभाव आणि पचन या तीन मूलभूत गोष्टी लक्षात ठेवतो. या नियमाचं पालन करणं फार अवघड नाही किंवा वेळही लागत नाही. 9 / 9विशेषतः जे तासनतास एकाच जागी बसून काम करतात त्यांच्यासाठी लठ्ठपणा कमी करण्याचा हा एक सोपा मार्ग असू शकतो. योगा, नियमित व्यायाम केल्याने, योग्य आहार घेतल्याने आपली प्रकृती उत्तम राहू शकते.