By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 12:33 IST
1 / 8दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असतेच पण शाकाहारी पदार्थांमध्येही त्यापेक्षा जास्त कॅल्शियम असते. (7 Foods For Calcium Rather Than Milk)2 / 8नाचणी हा कॅल्शियमचा सर्वोत्तम स्त्रोत आहे. 100 ग्रॅम नाचणीमध्ये दुधापेक्षा कित्येकपटीनं जास्त कॅल्शियम असते. जे हाडांच्या मजबूतीसाठी उपयुक्त ठरते. (7 Food That Gives Calcium More Than Milk)3 / 8 पांढऱ्या किंवा काळ्या तिळामध्ये प्रचंड प्रमाणात कॅल्शियम असते. फक्त एक चमचा तिळाचे सेवन शरीरातील कॅल्शियमची मोठी गरज पूर्ण करू शकते.4 / 8दुधाला पर्याय म्हणून सोयाबीन किंवा सोया पनीर वापरता येते. यात प्रथिनांसोबतच उच्च दर्जाचे कॅल्शियम मिळते.5 / 8सुक्या मेव्यामध्ये बदाम हा कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहे. दररोज भिजवलेले बदाम खाल्ल्यानं शरीराला नैसर्गिकरित्या कॅल्शियम मिळते.6 / 8 खसखसमध्ये केवळ कॅल्शियमच नाही तर मॅन्गनीज देखील असते. हे हाडांच्या आरोग्यासोबतच सांधेदुखीवरही परिणामाकारक ठरते.7 / 8 मेथी आणि शेपू यांसारख्या गडद हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. या भाज्या पचनास देखील हलक्या असतात.8 / 8या बियांमध्ये दुधाच्या तुलनेत जास्त कॅल्शियम आणि ओमेगा-3 फॅटी एसिड्स असतात. ज्यामुळे हाडं, हृदय दोन्ही निरोगी राहतात.