हे ७ पदार्थ पिकण्याची वाट पाहावी लागत नाही, कच्चेही खाऊ शकता - करता येतात मजेदार रेसिपी

Updated:October 6, 2025 18:26 IST2025-10-06T18:18:32+5:302025-10-06T18:26:56+5:30

you can eat these 7 foods raw too - tasty recipes you can make in no time : पाहा कच्च्या पदार्थांच्या रेसिपी. चविष्ट आणि पारंपरिक.

हे ७ पदार्थ पिकण्याची वाट पाहावी लागत नाही, कच्चेही खाऊ शकता - करता येतात मजेदार रेसिपी

एखादे फळ किंवा भाजी पिकल्यावरच खाल्ली जाते. मात्र काही पदार्थ असे ही असतात जे कच्चेही खाल्ले जातात. त्याची चव छान लागते आणि हे पदार्थही पारंपरिक आहेत.

हे ७ पदार्थ पिकण्याची वाट पाहावी लागत नाही, कच्चेही खाऊ शकता - करता येतात मजेदार रेसिपी

केळी फार पौष्टिक असतात. पिकलेली केळी जशी खाल्ली जातात तसेच कच्च्या केळीचे पदार्थ करता येतात. वेफर्स तर केले जातातच, मात्र चमचमीत केळीचे काप करता येतात. चवीला छान लागतात.

हे ७ पदार्थ पिकण्याची वाट पाहावी लागत नाही, कच्चेही खाऊ शकता - करता येतात मजेदार रेसिपी

कच्या टोमॅटोची भाजी चवीला फारच छान लागते. तसेच त्याची चटणी करता येते. हिरवे टोमॅटो बाजारात आरामात उपलब्ध होतात. त्याला छान फोडणी देऊन त्याची चटणी करा.

हे ७ पदार्थ पिकण्याची वाट पाहावी लागत नाही, कच्चेही खाऊ शकता - करता येतात मजेदार रेसिपी

फणसाचे गरे महाराष्ट्रात फार आवडीने खाल्ले जातात. तसेच कच्या फणसाठी भाजी फार चविष्ट असते. करायची पद्धत वेगवेगळी आहे आणि सगळ्याच रेसिपी भारी आहेत.

हे ७ पदार्थ पिकण्याची वाट पाहावी लागत नाही, कच्चेही खाऊ शकता - करता येतात मजेदार रेसिपी

सुरणाचे काप हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध असा पदार्थ आहे. त्यासाठी कच्चे सुरण वापरले जाते. हे फार पौष्टिक असते. चवही मस्तच.

हे ७ पदार्थ पिकण्याची वाट पाहावी लागत नाही, कच्चेही खाऊ शकता - करता येतात मजेदार रेसिपी

वांग्याची भाजी वारंवार केली जाते. मात्र कच्या वांग्याचे छान कापही करता येतात. पिकलेल्या वांग्याचेही काप करतात मात्र कच्या वांग्याचे जास्त चविष्ट लागतात. नक्की करुन पाहा.

हे ७ पदार्थ पिकण्याची वाट पाहावी लागत नाही, कच्चेही खाऊ शकता - करता येतात मजेदार रेसिपी

पपई हे फळ त्वचेसाठी फार फायद्याचे असते. तसेच कच्ची पपई ही खाल्ली जाते. मात्र नुसती नाही तर कच्ची पपई किसून त्याची चटणी केली जाते. ही चटणी चवीला मस्त असते.

हे ७ पदार्थ पिकण्याची वाट पाहावी लागत नाही, कच्चेही खाऊ शकता - करता येतात मजेदार रेसिपी

आंबा जेवढा आवडीने खाल्ला जातो, तेवढ्याच आवडीने कैरीही खाल्ली जाते. कैरी मस्त आंबट गोड असते. नुसती खातात तसेच त्याचे लोणचे, डाळ, सरबत आणि इतरही पदार्थ करता येतात.