1 / 8टोमॅटो सूप हे सर्वात लोकप्रिय सूप आहे. यात व्हिटॅमिन C, अँटिऑक्सिडंट्स आणि लाइकोपीन असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते. थोडे बटर आणि मिरीपूड टाकल्यास चव अजूनच खुलते.2 / 8गाजर, बीट, शेंगा, कोबी आणि टोमॅटो यांच्या मिश्रणातून तयार केलेले हे सूप पोषणाने समृद्ध असते. यात फायबर, जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात.3 / 8लसूण सूप सर्दी, खोकला यासाठी उत्तम मानले जाते. लसूणातील अँटी बॅक्टेरियल गुण शरीराला आजारांपासून संरक्षण देतात. हे सूप चविष्ट आणि शरीराला उब देणारे असते. त्यात कांदा तसेच चायनिज सॉस घालता येतात. 4 / 8 मक्याचे दाणे, गाजर असे पदार्थ घालून हे सूप करता येते, मुलांना आणि मोठ्यांनाही आवडते. यात कार्बोहायड्रेट, फायबर आणि जीवनसत्त्व बी भरपूर असते.5 / 8पालक सूप म्हणजे लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्व के चा उत्तम स्रोत आहे. हे रक्तवाढीसाठी आणि हाडे मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. थोडेसे क्रीम घालून केल्यास चव वाढते.6 / 8मसूर डाळीचे सूप प्रथिनांनी समृद्ध असते. पोटभरीचे आणि पचायला हलके असते. थोडा लिंबाचा रस त्यात पिळल्यास त्याची चव अजून वाढते.7 / 8ब्रोकोलीचे सूप करायला अगदी सोपे आहे. या सूपमध्ये जीवनसत्त्व सी आणि कॅल्शियम असतात. शरीराला ऊर्जा आणि ताकद देते. तसेच वजन कमी करण्यातही मदत करते.8 / 8मशरूम सूप प्रथिने आणि लोहाने समृद्ध असते. त्याचे क्रीमी टेक्स्चर आणि त्यात येणारी हलकी मिरीची चव सूप पिण्याची मजा वाढवते. हे थंड हवामानात उबदार आणि समाधान देणारे ठरते. तसेच पोटभरीचे असते.