Winter Recipes : पौष्टिक आणि चविष्ट सूप करण्याच्या पद्धती, तयार करा काही मिनिटांत आणि प्या गरमागरम
Updated:October 28, 2025 14:46 IST2025-10-28T14:40:58+5:302025-10-28T14:46:55+5:30
Winter Recipes: Nutritious and delicious soup recipes, prepare in minutes and drink hot : गरमागरम सूप प्या. पाहा मस्त रेसिपी. थंडीसाठी खास.

१. टोमॅटो सूप
टोमॅटो सूप हे सर्वात लोकप्रिय सूप आहे. यात व्हिटॅमिन C, अँटिऑक्सिडंट्स आणि लाइकोपीन असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते. थोडे बटर आणि मिरीपूड टाकल्यास चव अजूनच खुलते.
२. मिक्स व्हेजिटेबल सूप
गाजर, बीट, शेंगा, कोबी आणि टोमॅटो यांच्या मिश्रणातून तयार केलेले हे सूप पोषणाने समृद्ध असते. यात फायबर, जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात.
३. लसूण सूप
लसूण सूप सर्दी, खोकला यासाठी उत्तम मानले जाते. लसूणातील अँटी बॅक्टेरियल गुण शरीराला आजारांपासून संरक्षण देतात. हे सूप चविष्ट आणि शरीराला उब देणारे असते. त्यात कांदा तसेच चायनिज सॉस घालता येतात.
४. स्वीट कॉर्न सूप
मक्याचे दाणे, गाजर असे पदार्थ घालून हे सूप करता येते, मुलांना आणि मोठ्यांनाही आवडते. यात कार्बोहायड्रेट, फायबर आणि जीवनसत्त्व बी भरपूर असते.
५. पालक सूप
पालक सूप म्हणजे लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्व के चा उत्तम स्रोत आहे. हे रक्तवाढीसाठी आणि हाडे मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. थोडेसे क्रीम घालून केल्यास चव वाढते.
६. मसूर डाळ सूप
मसूर डाळीचे सूप प्रथिनांनी समृद्ध असते. पोटभरीचे आणि पचायला हलके असते. थोडा लिंबाचा रस त्यात पिळल्यास त्याची चव अजून वाढते.
७. ब्रोकोली सूप
ब्रोकोलीचे सूप करायला अगदी सोपे आहे. या सूपमध्ये जीवनसत्त्व सी आणि कॅल्शियम असतात. शरीराला ऊर्जा आणि ताकद देते. तसेच वजन कमी करण्यातही मदत करते.
८. मशरुम सूप
मशरूम सूप प्रथिने आणि लोहाने समृद्ध असते. त्याचे क्रीमी टेक्स्चर आणि त्यात येणारी हलकी मिरीची चव सूप पिण्याची मजा वाढवते. हे थंड हवामानात उबदार आणि समाधान देणारे ठरते. तसेच पोटभरीचे असते.