हे ७ पदार्थ मुले खातील आवडीने, त्यांना वाटेल चमचमीत आहेत मात्र पौष्टिक!
Updated:April 2, 2025 19:23 IST2025-04-02T19:16:19+5:302025-04-02T19:23:13+5:30
These 7 foods will be loved by children, delicious and nutritious : लहान मुले आवडीने खातील पौष्टिक पदार्थ. पाहा कोणते पदार्थ आहेत.

लहान मुलांना पौष्टिक आहार मिळणे फार गरजेचे असते. वाढत्या वयामध्ये शरीराला गरजेच्या असणार्या घटकांचा पुरवठा हा आहारातूनच होत असतो.
मात्र वाढत्या वयातील मुलांना त्यांच्यासाठी चांगल्या असणाऱ्या पदार्थांव्यतिरिक्त इतर अरबटचरबट खायला आवडते. त्यात काही गैर नाही. लहान मुलांना चमचमीत पदार्थ खावेसे वाटणे साहाजिकच आहे. आपल्यालाही असे पदार्थ खावेसे वाटतातच.
पण त्यांचे हट्ट कितपत पुरवावे याला एक मर्यादा असायला हवी. मुलांचे स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी त्यांना हे काही पदार्थ खायला द्या. त्यांना ते आवडतातही आणि पौष्टिकही असतात.
रोज रात्री २ ते ४ बदाम पाण्यामध्ये भिजत घाला. रोज सकाळी मुलांना भिजलेले बदाम खायला द्या. वर्षानुवर्षे भिजवलेले बदाम फायदेशीर ठरत आले आहेत. मुलांची बौद्धिक वाढ होण्यासाठी बदाम मदत करतात.
लहान मुलांना सुकामेवा आवडतो. रोज थोडा सुकामेवा त्यांना खायला द्या. बदाम रोज द्याच, पण काजू, बेदाणे, पिस्ता हे सगळं ही अधून मधून देत राहा. सुकामेवा अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण असतो.
मुलांना चीज खायला आवडत असेल, तर त्यांना चीज घालून सॅलाड द्या. चीज पराठा तयार करून द्या. चीज योग्य प्रमाणात खाणे शरीरासाठी फायद्याचेच असते.
लहान मुलांना पाले भाज्या आवडत नाहीत. पाले भाज्यांचे डोसे तयार करणे फारच सोपे असते, शिवाय दिसतातही रंगीबेरंगी. असे डोसे तयार करून त्यामधून पाले भाज्या पोटात जाऊ द्या.
कडधान्ये खायचे म्हटले तरी नाक मुरडतात. पण मुलांना भेळ खायला नक्कीच आवडेल. शिजवलेल्या कडधान्यांमध्ये कांदा, टोमॅटो, चाट मसाला, कोथिंबीर घालून छान पौष्टिक भेळ तयार करा. मुलांना नक्की आवडेल.
लहान मुलांना रोज थोड्या भोपळ्याच्या बिया आणि इतरही काही बिया असतात त्या खायला द्या. बियांमध्ये कमालीचे पोषण असते. चवीलाही त्या छान गोड असतात. त्यामुळे मुलांना आवडतात.
खजूराचे पदार्थ तयार करून मुलांना खायला द्या. तसेच गोड खाण्याची इच्छा झाल्यावर साखरेऐवजी गूळ खायला द्या. ते उत्तम ठरेल. गूळ पौष्टिक असतो. आणि गोड खाण्याची इच्छाही भागवतो.