Join us

ना साखर ना तेल आहारातले हे ७ पदार्थ वाढवतात फॅट्स वेगाने, खातच राहिलात तर आयुष्य होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2025 16:50 IST

1 / 8
आपल्या रोजच्या आहारातील काही पदार्थ आरोग्यासाठी काही प्रमाणात चांगले असले तरी रोज खाल्याने वजन, फॅट्स वाढवतात. त्यामुळे खाण्याआधी विचार करा. मगच खा.
2 / 8
भातामध्ये फायबर कमी आणि ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. त्यामुळे तो पटकन पचतो आणि लगेच भूक लागते, परिणामी जास्त प्रमाणात खाल्ला जातो. त्यामुळे भात खाताना त्यावर तूप घ्यावे. तसेच भात कमी आणि डाळ जास्त घ्यावी.
3 / 8
गव्हाचे असले तरी हे तूप किंवा तेलात तळलेले असतात. त्यामुळे फॅट्सचे प्रमाण वाढते आणि शरीरात साठू लागते.
4 / 8
बटाटा वाईट नाही, पण त्याचे फ्राय, कटलेट तेलकट भाजी किंवा चिप्स करुन खाणे पचनासाठी चांगले नाही. त्यातले स्टार्च आणि तेल दोन्ही फॅट्स वाढवतात.
5 / 8
हे पदार्थ प्रोटीनयुक्त असले तरी फॅट्सचे प्रमाण जास्त असते. रोजच्या जेवणात यांचा अति वापर केल्यास वजन वाढते. तसेच तळून परतून खाल्यामुळे त्याचे पोषण कमी होते.
6 / 8
मैद्यापासून केलेले असल्याने यात पोषक तत्त्वे नसतात. हे पटकन पचतही नाहीत आणि ऊर्जा लगेच संपते, वारंवार भूक लागते. पोटात चिकटून बसतात.
7 / 8
घरातले असले तरी हे तेलात तळलेले असल्याने त्यात ट्रान्स फॅट्स वाढतात, जे वजन वाढवण्यास आणि कोलेस्टेरॉल वाढवण्यास कारणीभूत असतात.
8 / 8
हे जरी चवीला छान लागले तरी सॅच्युरेटेड फॅट्सने भरलेले असतात. रोजच्या आहारात असतील तर फॅट्स साठतात आणि वजन वाढते. दुग्धजन्य पदार्थ योग्य प्रमाणात खाल्ले तरच फायद्याचे ठरतात.
टॅग्स : अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य