1 / 7बीट आरोग्यासाठी फार फायद्याचे असते. त्वचा आणि केस दोन्हीसाठी ते उपयुक्त ठरते. बीट उकडून तर खातातच मात्र त्याचे विविध पदार्थही करता येतात. 2 / 7बाटाचे डोसे करता येतात. छान गुलाबी रंगाचे दिसतात. डोश्याचे पीठ भिजवल्यावर त्यात बीटाचा रस ओतायचा. पाण्याऐवजी हा रस घ्यायचा. वरती गरज असेल तर थोडे पाणी घ्यायचे. 3 / 7नाश्त्यासाठी झटपट आणि पौष्टिक असा पदार्थ म्हणजे बीटाचे पराठे. करायला अगदी सोपे असतात. तसेच त्यात थोडे पनीर घालून त्याची चव वाढवता येते. मसाले घालायचे आणि चटणीसोबत खायचा. 4 / 7बीटाचे कटलेट तर लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ असतो. करायला ही सोपे असते. शिवाय भाज्यांनी भरलेले असते. त्यात विविध प्रकारच्या भाज्या असतात. 5 / 7आलिया भटमुळे प्रसिद्ध झालेली बीटाची कोशिंबीर फार पारंपरिक पदार्थ आहे. सोशल मिडियावर आत्ता गाजलेला असला तरी हा वर्षानुवर्षे घरोघरी केला जाणारा पौष्टिक पदार्थ आहे. 6 / 7बीटाचे छान गुलाबी अप्पे करता येतात. बीट उकडून कुस्करायचे आणि मग अप्पे पिठात मिक्स करायचे. चव मस्त आणि रंगही छान येतो. लहान मुलांना नक्की आवडतील. 7 / 7चविष्ट आणि पौष्टिक असे गाजर-बीट सूप आहारात नक्की असावे. वजन कमी करण्यासाठी जर प्रयत्न करत असाल तर डाएटमध्ये हे सूप घ्या. पोट तर भरतेच शिवाय मनही भरते.