1 / 8मुलांच्या शाळा आता नुकत्याच सुरू झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना डब्यात काय द्यावं हा प्रश्न पुन्हा एकदा मुलांच्या आईंना पडायला लागलेला आहे. 2 / 8कारण मुलांना काहीतरी वेगळं, चवदार हवं असतं. तेच ते पोळीभाजी त्यांना नको वाटतं. आणि त्याउलट आईला मात्र आपल्या मुलांनी पौष्टिक खावं असं वाटत असतं. म्हणूनच मुलांच्या डब्यासाठी हे काही पौष्टिक पर्याय पाहा. मुलांना हे पदार्थ खायला नक्कीच आवडतील.3 / 8इडली चटणी हा पदार्थ मुलं आवडीने खातात. त्यामुळे डब्यासाठी हा एक चांगला पर्याय होऊ शकतो. शिवाय इडल्या करायला खूप वेळही लागत नाही. 4 / 8अप्पे हा देखील एक चांगला पर्याय आहे. तुम्ही रवा, ओट्स किंवा डाळ- तांदळाचे अप्पेही करू शकता. ते अधिक पौष्टिक आणि चवदार होण्यासाठी टोमॅटो, पत्ताकोबी, सिमला मिरची, कांदा अशा भाज्या मिक्सरमधून अगदी बारीक करून घ्या. आता ही भाज्यांची प्युरी अप्पे पिठात घाला. याचे अप्पे जास्त छान लागतात.5 / 8वेगवेगळ्या भाज्या किसून केलेले पराठे हा देखील एक चवदार आणि पोष्टिक पदार्थ होऊ शकतो. 6 / 8पनीर पराठा, पनीरची भाजी, पनीर पकोडे असे पनीरचे वेगवेगळे पदार्थही बहुसंख्य मुलं आवडीने खातात. 7 / 8मुगाच्या डाळीचे धिरडे हा देखील एक पौष्टिक पदार्थ आहे. त्यातून मुलांना चांगल्या प्रमाणात प्रोटीन्स मिळतील. आलं, लसूण, कांदा, टोमॅटो यासोबतच इतर भाज्या घालून तुम्ही त्या धिरड्यांना आणखी चवदार बनवू शकता. 8 / 8भरपूर भाज्या घालून केलेला पुलाव, मसालेभात खायलाही मुलांना आवडतं. पुलावमधल्या भाज्यांची चव वेगळीच लागते. त्यामुळे एरवी भाज्या न खाणारी मुलंही पुलाव, मसालेभातातल्या भाज्या आवडीने खातात.