1 / 9गाजर आपण कोशिंबीरमध्ये वापरतो तसेच गाजराचा मस्त चविष्ट गाजर हलवाही करतो. गाजराची खीरही छान लागतो. पण तुम्ही नुसतं गाजर खाता का?2 / 9गाजराचा आहारात समावेश असलाच पाहिजे. पौष्टिक पदार्थ चविष्टही असतात तसाच एक पदार्थ म्हणजे गाजर. गाजरामध्ये अनेक गुणधर्म असतात. 3 / 9गाजर चवीलाही छान गोड असते. त्यामुळे रोज एक खायला काहीच हरकत नाही. पाहा गाजराचे किती फायदे आहेत.4 / 9चष्मा वापरणार्या लोकांना कायम सांगितले जाते की गाजर खा. कारण गाजरातून जीवनसत्व 'ए' शरीराला मिळते. गाजर खाल्ल्याने दृष्टी चांगली राहते. रातांधळेपणा असणार्यांनीही गाजर खावे.5 / 9 गाजरामध्ये बिटा कॅरेटिन असते. हे कॅरेटिन शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. कॅन्सरसारखे विषाणूही कमी करते.6 / 9शरीराला गरजेची असलेली ऊब गाजरातून मिळते. एक गाजर जरी खाल्ले तरी ते पोटभरीचे होते. गाजराचा ज्यूस करा आणि तो प्या. तसेच नुसत्या गाजराची कोशिंबीरही छान लागते. 7 / 9गाजरामध्ये अँण्टी ऑक्सिडंट्स असतात. भरपूर प्रमाणात खनिजे असतात. त्यामुळे त्वचेसाठी गाजर फार उपयुक्त ठरते. त्वचेवरील डाग कमी होतात. 8 / 9महिलांनी तर गाजर खायलाच हवे. कारण गाजर हाडांचे आयुष्य वाढवते. तसेच हाडांना मजबुती देते. कुरकुरणाऱ्या हाडांनाही ताकद मिळते.9 / 9वजन कमी करायचे असेल तर मग गाजर खाच. गाजरामुळे वजन कमी होण्यासाठी मदत होते. मध्येच काही खायची हुक्की आली की गाजर, बीट, काकडी असे पदार्थ खायचे.