काबुली चण्याचे करा ७ चविष्ट पदार्थ - नाश्ता ते जेवण विविध प्रकारच्या रेसिपी , पोटभर खा

Updated:November 3, 2025 17:37 IST2025-11-03T17:29:03+5:302025-11-03T17:37:10+5:30

Make 7 delicious dishes with chickpeas - a variety of recipes from breakfast to dinner : पोटभर खा चविष्ट चमचमीत आणि पौष्टिक असे काबुली चण्याचे पदार्थ.

काबुली चण्याचे करा ७ चविष्ट पदार्थ - नाश्ता ते जेवण विविध प्रकारच्या रेसिपी , पोटभर खा

काबुली चणे म्हणजेच छोले चवीला फार मस्त असतात. त्याचे विविध पदार्थ करता येतात. त्यापैकीच काही सोपे पदार्थ पाहा आणि नक्की करा.

काबुली चण्याचे करा ७ चविष्ट पदार्थ - नाश्ता ते जेवण विविध प्रकारच्या रेसिपी , पोटभर खा

चणा कोळीवाडा हा पदार्थ फार लोकप्रिय आहे. स्टार्टर्ससाठी केला जातो. घरी करणे सोपे आहेच शिवाय तो काबुली चण्यांचाच असतो. नक्की करुन पाहा.

काबुली चण्याचे करा ७ चविष्ट पदार्थ - नाश्ता ते जेवण विविध प्रकारच्या रेसिपी , पोटभर खा

उकडलेले काबुली चणे, टोमॅटो, काकडी, कांदा, कोथिंबीर आणि थोडा लिंबू रस मिसळून झटपट सॅलेड तयार होतं. त्यात काळं मीठ आणि थोडं चाट मसाला घातल्याने चव अधिक छान लागते.

काबुली चण्याचे करा ७ चविष्ट पदार्थ - नाश्ता ते जेवण विविध प्रकारच्या रेसिपी , पोटभर खा

कांदा, टोमॅटो आणि मसाल्यांचा स्वादिष्ट तडका देऊन केलेली ही भाजी पूर्‍या, भात किंवा भाकरीसोबत मस्त लागते. पंजाबचा हा लोकप्रिय पदार्थ प्रथिनांनी भरलेला असतो.

काबुली चण्याचे करा ७ चविष्ट पदार्थ - नाश्ता ते जेवण विविध प्रकारच्या रेसिपी , पोटभर खा

उकडलेले काबुली चणे कुस्करून त्यात बटाटे, आले, हिरवी मिरची, आणि मसाले घालून कटलेट करतात. तव्यावर परतून घेतल्यावर मस्त कुरकुरीत लागतात.

काबुली चण्याचे करा ७ चविष्ट पदार्थ - नाश्ता ते जेवण विविध प्रकारच्या रेसिपी , पोटभर खा

उकडलेले चणे मिक्सरमध्ये फिरवून त्याचं सूप तयार करता येतं. त्यात भाज्यांचा स्टॉक, काळी मिरी आणि थोडं बटर घालून केलं हे सूप चविष्ट आणि पौष्टिक असतं.

काबुली चण्याचे करा ७ चविष्ट पदार्थ - नाश्ता ते जेवण विविध प्रकारच्या रेसिपी , पोटभर खा

हा लोकप्रिय पदार्थ उकडलेल्या काबुली चण्यांपासून करतात. मध्यंतरी सोशल मिडियावर हुमस फार प्रसिद्ध होते. त्यात ऑलिव्ह तेल, लिंबाचा रस, लसूण आणि इतर काही पदार्थ मिसळून तयार करतात, सॅंडविच किंवा भाज्यांसोबत खाल्लं जातं.

काबुली चण्याचे करा ७ चविष्ट पदार्थ - नाश्ता ते जेवण विविध प्रकारच्या रेसिपी , पोटभर खा

भातात उकडलेले काबुली चणे, कांदा, टोमॅटो आणि मसाले घालून केलेला चना पुलाव हे पौष्टिक आणि पोटभरीचे असते. दह्यासोबत ते अगदी अप्रतिम लागते.