1 / 6कोशिंबीर म्हणजे पौष्टिक आणि झटपट होणारा पदार्थ. रोजच्या आहारात एखादी कोशिंबीर नक्की असावी. पाहा ५ रेसिपी ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील. 2 / 6काकडी–दही कोशिंबीर ही रोजच्या जेवणातला हलका छान पदार्थ आहे. काकडी किसून त्यात घट्ट दही घाला. चवीनुसार मीठ, थोडी साखर, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि जिरे पूड घालून मिक्स करा. सगळं नीट एकत्र करुन वरुन कोथिंबीर घाला. ही कोशिंबीर भाजी-पोळी किंवा भातासोबत खूप छान लागते.3 / 6गाजराची कोशिंबीर रंगाने सुंदर आणि चवीला खमंग लागते. किसलेल्या गाजरात भाजून कुटलेले शेंगदाणे घाला. त्यात मीठ आणि लिंबाचा रस घालून नीट मिक्स करा. वरुन कोथिंबीर घाला फोडणी द्या. 4 / 6टोमॅटो–कांदा कोशिंबीर ही अगदी झटपट होणारी आणि चव वाढवणारी कोशिंबीर आहे. टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून एकत्र करा. त्यात मीठ, साखर, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि लिंबाचा रस घाला. सगळं नीट मिसळून वरुन कोथिंबीर घाला. वरण-भातासोबत ही कोशिंबीर फार छान लागते.5 / 6डाळिंब कोशिंबीर गोड-तिखट चवीची आणि पौष्टिक असते. डाळिंबाचे दाणे एका भांड्यात घ्यावेत. त्यात किसलेले खोबरे, मीठ, थोडी साखर आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला. हलक्या हाताने सगळं मिसळून वरुन कोथिंबीर घाला. 6 / 6बीट–दही कोशिंबीर रंगाने आकर्षक आणि आरोग्यदायी असते. उकडलेले बीट किसून त्यात दही घाला. चवीनुसार मीठ आणि जिरे पूड घाला. सगळं एकत्र करा आणि वरतून छान मोहरीची फोडणी द्या.