Join us

Kolhapuri veg food : जगात भारी कोल्हापूरी! पश्चिम महाराष्ट्रातील खास १० पदार्थ, तोंडाला पाणी सुटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2025 16:43 IST

1 / 11
दक्षिण-पश्चिम महाराष्ट्राच्या भागात सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. या पट्ट्याला साखर पट्टा असेही संबोधले जाते. मोठ्या प्रमाणावर ऊसाचे उत्पादन होत असल्याने साखर कारखाने या पट्ट्यात आहेत. तेथील जेवण मात्र झणझणीत आणि चमचमीत आहे.
2 / 11
कोल्हापूर सांगली वरुन जर कोणी नातेवाईक येत असतील तर ते खाऊ म्हणून काय आणणार हे आपल्याला माहिती असते. तो पदार्थ म्हणजे भडंग. या पट्ट्यातील चमचमीत, तिखट भडंग भरपूर लोकप्रिय आहे. चुरमुरे, दाणे, मसाले, खोबरं आदी पदार्थांची ही भडंग नक्की खाऊन पाहा.
3 / 11
गुळाचे सारण भरुन केलेली गोड खमंग पोळी सणासुदीला तसेच इतरही वेळी केली जाते. करायला अगदी सोपी आणि कमी सामग्रीत होणारी ही पोळी चवीला मात्र एकदम गोड आणि मऊ असते. महाराष्ट्रात हा पदार्थ तसा लोकप्रिय आहेच. मकर संक्रांतीतला हा पदार्थ आवर्जून केला जातो.
4 / 11
भाताच्या अनेक प्रकारांपैकी एक म्हणजे मसाले भात. सांगली, सातारा या ठिकाणी लग्न समारंभांत मसाले भात असतोच. पिवळ्या रंगाचा हा भात कांदा, टोमॅटो, तोंडली, बटाटा, वांगी , मसाले , खडे मसाले अशा अनेक पदार्थांच्या मिश्रणातून केला जातो.
5 / 11
वडापाव, मिसळपाव जेवढ्या आवडीने महाराष्ट्रात खाल्ला जातो तेवढ्याच आवडीने पश्चिम महाराष्ट्रात कटवडा खाल्ला जातो. हा कटवडा म्हणजे लाल रस्स्यात बटाटा वडा घालून केलेला पदार्थ आहे. कट म्हणजे मिसळीचा रस्सा ज्याला तर्री म्हणतात. इतरही काही नावे आहेत. झणझणीत कट आणि खमंग वडा हे कॉम्बिनेशन खरंच जगातभारी आहे.
6 / 11
अस्सल कोल्हापूरी मिसळ खायला लोक लांबून पश्चिम महाराष्ट्रात येतात. इतर ठिकाणी तुझी मिसळ चांगली का माझी मिसळ चांगली हा वाद सुरु असतात. कोल्हापूरी मिसळ अजिबात या फंदातच पडत नाही. जगातभारी कोल्हापूरी असे म्हणत कोल्हापूरकर या मिसळीवर ताव मारतात. ब्रेड किंवा पावासोबत ही मिसळ खाल्ली जाते.
7 / 11
आजकाल हॉटेल मेन्यूमध्ये अनेक नव्या भाज्यांची नावे दिसतात. मात्र व्हेज कोल्हापूरीची जागा आजही कोणी घेऊ शकले नाही. झणझणीत कोल्हापूरी रस्सा तयार करुन त्यात शिजवलेल्या भाज्या घालून ही भाजी केली जाते. डोळ्यातून पाणी आले तरी लोक आवडीने खातात.
8 / 11
सातारी कंदी पेढा ऐकला नाही असा नेमकाच कोणी असेल. खाव्याचे हे गोड पेढे सगळीकडे प्रसिद्ध आहेत. कोणी साताऱ्याला गेले की येतात हे पेढे खाऊ म्हणून नक्की घेऊन येतात. घरी करायलाही हा पदार्थ सोपा आहे. मात्र साताऱ्यात काही ठिकाणी हा पदार्थ मिळतो.
9 / 11
सांगलीची लाटीवडी फार लोकप्रिय आहे. गव्हावे पीठ आणि बेसन वापरुन त्यात मसाले घातले जातात. ही वडी नाश्त्यासाठी चहासोबत खाल्ली जाते. सारण भरुन केलेली ही वडी करायला जरा किचकट आहे. मात्र एकदा जमली की परतपरत कराल.
10 / 11
महाराष्ट्रातील लोक अख्खा मसूर खाण्यासाठी खास पश्चिम महाराष्ट्रात जातात. सालीसकट मसूर घेऊन ही भाजी केली जाते. कोल्हापूरी अख्खा मसूर असेही याला म्हटले जाते. भाकरी सोबत ही भाजी खाल्ली जाते. भाजीला तवंग, तर्री असते तसेच भरपूर मसालेदार असा हा पदार्थ आहे.
11 / 11
तांदळाचा गोड पदार्थ साताऱ्यात लोकप्रिय आहे. त्याला सातारी जर्दा असे म्हणतात. यामध्ये साखर, केशर, खोबरं, साखर, सुकामेवा लाल रंग असे पदार्थ वापरले जातात. वेलची आणि दालचिनी तसेच लवंगही घातली जाते. तांदूळ जाड वापरला जातो. हा पदार्थ जरा हटके आहे.
टॅग्स : अन्नकोल्हापूर पूरकोल्हापूरसांगलीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.