1 / 9डाळी व कडधान्ये हा भारतीय जेवणातील एक अविभाज्य भाग आहे. डाळी आणि कडधान्ये (How Long Should Pulses Be Soaked Dal To Prevent Bloating) पौष्टिक असले तरी हे दोन्ही पदार्थ पचायला थोडे जड असतात. यामुळेच डाळ व कडधान्ये तयार करण्याआधी त्यांना भिजत घालण्याची पद्धत पूर्वापार चालत आलेली आहे. डाळी व कडधान्ये भिजवल्याने त्यातील पोषणमूल्ये वाढतात आणि ते पचायला अधिक हलके होतात.2 / 9डाळी व कडधान्ये शिजवण्याआधी ते योग्य वेळ पाण्यात भिजत घालणे ( how long to soak dal before cooking) महत्त्वाचे मानले जाते. यामुळे डाळी व कडधान्ये लवकर शिजतात, पचायला हलके होतात आणि त्यांचे पोषणमूल्यही शरीराला चांगल्या प्रकारे मिळते. कोणती डाळ व कडधान्ये किती वेळ भिजवावी आणि भिजवण्यामागचे खरे फायदे काय आहेत, हे जाणून घेऊयात... 3 / 9१. सालं नसणाऱ्या डाळी जसे की, लाल मसूर, पिवळी मूग डाळ, पिवळी तूर डाळ या डाळी तयार करण्यापूर्वी किमान ३० मिनिटे पाण्यांत भिजत ठेवाव्यात. 4 / 9२. सालं असणारी हिरवी मूग डाळ किंवा इतर सालं असणाऱ्या डाळी तयार करण्यापूर्वी किमान २ ते ४ तास पाण्यांत भिजत ठेवाव्यात. 5 / 9३. यासोबतच, चण्याच्या डाळींचे कोणतेही पदार्थ तयार करण्यापूर्वी चणा डाळ किमान २ ते ४ तासांसाठी पाण्यांत भिजत ठेवावी. 6 / 9 ४. हिरवे मूग आणि काळे उडीद यांसारखी कडधान्ये ६ ते ८ तासांसाठी पाण्यांत भिजत ठेवावेत. 7 / 9५. छोले, चणे व राजमा यांसारखी कडधान्ये तयार करण्यापूर्वी ६ ते ८ तास किंवा रात्रभरासाठी पाण्यांत भिजत ठेवावे. 8 / 9 ६. छोले, चणे व राजमा यांसारखी कडधान्ये शिजवताना त्यात लवंग, तमालपत्र आणि मोठी वेलची घालावी. यामुळे ही कडधान्ये खाल्ल्यानंतर पोटात येणारा जडपणा, गॅसेसचा त्रास कमी होण्यास मदत होते. 9 / 9७. डाळी तयार करताना, डाळींना हिंग, जिरे आल्याची फोडणी जरूर द्यावी यामुळे डाळी खाल्ल्यानंतर होणारे गॅसेस, अपचन, ॲसिडिटी यांसारखे त्रास कमी होण्यास मदत होते.