नाश्ता करताना लक्षात ठेवा ८ गोष्टी, कोलेस्टेरॉल-मधुमेह-वाढत्या वजनाचं टेन्शनच होईल कमी!

Updated:June 23, 2025 17:05 IST2025-06-23T16:47:18+5:302025-06-23T17:05:11+5:30

नाश्ता करताना लक्षात ठेवा ८ गोष्टी, कोलेस्टेरॉल-मधुमेह-वाढत्या वजनाचं टेन्शनच होईल कमी!

आपल्या तब्येतीच्या दृष्टीने नाश्त्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे तो जर तुम्ही अधिकाधिक पौष्टिक पदार्थ असणारा केला तर त्याचा आरोग्यावर निश्चितच खूप चांगला फरक दिसून येतो.(healthy breakfast options)

नाश्ता करताना लक्षात ठेवा ८ गोष्टी, कोलेस्टेरॉल-मधुमेह-वाढत्या वजनाचं टेन्शनच होईल कमी!

वाढतं वजन, काेलेस्टेरॉल, मधुमेह असे अनेक त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते. यासाठी खूप काही वेगळे पदार्थ खाण्याची गरज नाही. फक्त तुमचे नेहमीचेच पदार्थ थोड्या वेगळ्या पद्धतीने खाल्ले तरी ते पुरेसं आहे. त्यासाठी नाश्त्यामध्ये नेमके काय बदल करायचे (how to make your regular breakfast more healthy and tasty?), याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी amitagadre या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.(perfect breakfast menu to control diabetes and cholesterol)

नाश्ता करताना लक्षात ठेवा ८ गोष्टी, कोलेस्टेरॉल-मधुमेह-वाढत्या वजनाचं टेन्शनच होईल कमी!

यामध्ये त्यांनी सांगितलेली पहिली गोष्ट म्हणजे नाश्याला जर पोहे खाणार असाल तर पोह्यांमध्ये मुठभर कडधान्ये नक्की घाला. यामुळे पोह्यांची पौष्टिकता जास्त वाढेल.

नाश्ता करताना लक्षात ठेवा ८ गोष्टी, कोलेस्टेरॉल-मधुमेह-वाढत्या वजनाचं टेन्शनच होईल कमी!

ब्रेड बटर खायचं असेल तर बटर आणि ब्रेडचं प्रमाण कमी ठेवा आणि ते पनीरसोबत खा.

नाश्ता करताना लक्षात ठेवा ८ गोष्टी, कोलेस्टेरॉल-मधुमेह-वाढत्या वजनाचं टेन्शनच होईल कमी!

इडली, डोसा खायचा असेल तर त्यासोबत भरपूर भाज्या घातलेलं सांबार आणि लो फॅट पनीर खायला विसरू नका.

नाश्ता करताना लक्षात ठेवा ८ गोष्टी, कोलेस्टेरॉल-मधुमेह-वाढत्या वजनाचं टेन्शनच होईल कमी!

साबुदाणा खिचडी खायची असेल तर त्याच्यासोबत भरपूर प्रोटीन्स असणारं दही किंवा योगर्ट खा.

नाश्ता करताना लक्षात ठेवा ८ गोष्टी, कोलेस्टेरॉल-मधुमेह-वाढत्या वजनाचं टेन्शनच होईल कमी!

कॉर्नफ्लेक्स खायचं असेल तर त्यात प्रोटीन घालून खा. किंवा मग त्याच्याऐवजी ओट्स खा.

नाश्ता करताना लक्षात ठेवा ८ गोष्टी, कोलेस्टेरॉल-मधुमेह-वाढत्या वजनाचं टेन्शनच होईल कमी!

आलु पराठा खाणार असाल तर त्यात थोडं पनीरही घाला. किंवा मग आलू पराठा हाय प्रोटीन योगर्ट किंवा १ वाटी दही यासोबत खा.

नाश्ता करताना लक्षात ठेवा ८ गोष्टी, कोलेस्टेरॉल-मधुमेह-वाढत्या वजनाचं टेन्शनच होईल कमी!

मस्का पाव आणि चहा, वेगवेगळ्या रेडिमेड मिळणाऱ्या चॉकलेट पावडर आणि दूध हे खाणं पुर्णपणे टाळा.

नाश्ता करताना लक्षात ठेवा ८ गोष्टी, कोलेस्टेरॉल-मधुमेह-वाढत्या वजनाचं टेन्शनच होईल कमी!

नाश्त्यामध्ये नुसती फळं खाऊ नका. मुगडाळीचं धिरडं, पनीर पराठा यासोबत ते खा. जास्त पौष्टिक ठरेल.