पाहा वजन झरझर कमी करणाऱ्या पोळ्या! कणकेत मिसळा ४ पदार्थ, पोळ्या होतील मऊ-पोळ्या खाऊनही चरबी गायब

Updated:January 21, 2026 16:43 IST2026-01-21T16:32:48+5:302026-01-21T16:43:26+5:30

पाहा वजन झरझर कमी करणाऱ्या पोळ्या! कणकेत मिसळा ४ पदार्थ, पोळ्या होतील मऊ-पोळ्या खाऊनही चरबी गायब

गव्हाच्या पिठाच्या पोळ्यांमध्ये ग्लुटेनचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे त्या वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात. म्हणूनच कणिकेमध्ये तुम्ही काही पदार्थ मिसळून त्याच्या पोळ्या किंवा चपात्या खाल्ल्या तर त्या नक्कीच जास्त पौष्टिक असतील आणि शिवाय त्यामुळे वेटलॉस होण्यासही मदत होईल.(5 ways to make wheat chapati more healthy)

पाहा वजन झरझर कमी करणाऱ्या पोळ्या! कणकेत मिसळा ४ पदार्थ, पोळ्या होतील मऊ-पोळ्या खाऊनही चरबी गायब

त्यातला पहिला पदार्थ आहे सातुचं पीठ. सातूच्या पिठामध्ये चांगल्या प्रमाणात प्रोटीन्स असतात. गव्हाच्या पिठात थोडं सातूचं पीठ घालून त्याच्या पोळ्या केल्यास प्रोटीन इनटेक वाढतो.(how to make wheat chapati protein rich?)

पाहा वजन झरझर कमी करणाऱ्या पोळ्या! कणकेत मिसळा ४ पदार्थ, पोळ्या होतील मऊ-पोळ्या खाऊनही चरबी गायब

जवस भाजून त्याची थोडी पावडर करून घ्या आणि कणकेमध्ये ती मिसळून त्याच्या पोळ्या करा. त्यातून ओमेगा ३ आणि इतर अमिनो ॲसिड मिळतात. हृदयाच्या आरोग्यासाठीही जवस फायदेशीर असतात.

पाहा वजन झरझर कमी करणाऱ्या पोळ्या! कणकेत मिसळा ४ पदार्थ, पोळ्या होतील मऊ-पोळ्या खाऊनही चरबी गायब

१०० ग्रॅम ओट्समधून जवळपास १७ ग्रॅम प्रोटीन्स मिळतात. त्यामुळे गव्हाच्या पिठात थोडे मिक्सरमधून बारीक केलेले ओट्स घालून पाहा. पोळ्या जास्त पौष्टिक आणि चवदार होतील.

पाहा वजन झरझर कमी करणाऱ्या पोळ्या! कणकेत मिसळा ४ पदार्थ, पोळ्या होतील मऊ-पोळ्या खाऊनही चरबी गायब

भोपळ्याच्या बिया हा देखील प्रोटीन्सचा एक चांगला स्त्रोत मानला जातो. भोपळ्याच्या बिया हलक्या भाजून घ्या आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमधून फिरवून त्यांची पावडर करा. ही पावडर कणिकेमध्ये घातल्यास त्याच्या पोळ्या निश्चितच जास्त हेल्दी होतील.