1 / 7तब्येत ठणठणीत ठेवायची असेल, वजन वाढू द्यायचं नसेल तर पुढे सांगितलेले काही पदार्थ तुमच्या आहारात नियमितपणे असायला हवे.2 / 7ते पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी dr.gaurangi.karmarkar या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. ते ५ पदार्थ कोणते ते पाहूया.. 3 / 7पाचव्या क्रमांकावर आहे खिचडी. तुपाची फोडणी आणि भरपूर भाज्या घातलेली खिचडी प्रोटीन्स आणि फायबर देणारी असते. पचायलाही ती खूप हलकी असते. 4 / 7चौथ्या क्रमांकावर येतो बहुतांश लोकांच्या आवडीचा इडली सांबार. सांबारमध्ये डाळी, भाज्या असतात. त्यामुळे त्यातूनही प्रोटीन्स आणि फायबर चांगल्या प्रमाणात मिळतात. 5 / 7यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येणारा पौष्टिक पदार्थ म्हणजे बेसनाचं धिरडं. बेसनाचं धिरडं नारळाच्या चटणीसोबत खाल्ल्यास त्यातून प्रोटीन्स, फायबर चांगल्या प्रमाणात मिळतात. शिवाय त्यातून कॅलरीही खूप कमी मिळतात.6 / 7आहारतज्ज्ञांच्या मते तर तुपाची फोडणी घालून केलेली भाजी आणि पोळी हे सुद्धा अतिशय आरोग्यदायी आणि एक पूर्ण आहार मानली गेलेली आहे. 7 / 7भाज्या घालून केलेला दलिया हा देखील अतिशय पौष्टिक आहे. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स आणि त्यातून मिळणाऱ्या कॅलरी हे दोन्ही कमी असून नाश्ता, लंच तसेच डिनर म्हणूनही तुम्ही दलिया खाऊ शकता.