By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 18:10 IST
1 / 7भारतात हल्ली मुलांच्या आहारात जिभेला चव देणारे पण आरोग्याला घातक असणारे अनेक पदार्थ समाविष्ट झाले आहेत. (5 Everyday Foods That May Harm Your Child)2 / 7अति साखरेमुळे दातांच्या समस्या निर्माण होतात आणि मुलांची एकाग्रता कमी होऊन ती अतिचंचल होतात. (5 Common Foods That Are Silently Harming Children)3 / 7 इंस्टंट नुडल्समध्ये मैदा आणि सोडीयमचे प्रमाण जास्त असते तसंच एम. एस. जी सारख्या रसायनांमुळे पचनशक्तीवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.4 / 7 पॅकेज्ड ज्यूस आणि कोल्ड ड्रिंक्समध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. जे लठ्ठपणा आणि बालवयातील मधुमेहास कारणीभूत ठरते.5 / 7तळलेल्या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट्स आणि अति मीठ असते. ज्यामुळे कमी वयातच हृदयविकाराचा झटका आणि कोलेस्टेरॉलचा धोका वाढू शकतो.6 / 7मैद्यामुळे बद्धकोष्टतेचा त्रास होतो आणि शरीराला कोणतेही पोषक घट मिळत नाहीत आणि मैद्याचे पदार्थ सर्रास मुलांच्या डब्यात दिले जातात.7 / 7मुलांना हे पदार्थ देण्याऐवजी घरी बनवलेले ताजे पदार्थ, फळं आणि सुका मेवा देण्यावर भर द्यावा जेणेकरून त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ व्यवस्थित होईल.