1 / 9भारतातील योगाभ्यासाचा स्वीकार जगभारातून झाला आहे. अत्यंत प्रभावी असा हा व्यायाम प्रकार प्रत्येकाने नक्की करायला हवा. योगासन करणे फार कठीण असते असा काहींचा समज असतो. मात्र योगासनांमध्ये सोपे प्रकारही असतात जे सगळ्यांना अगदी सहज करता येतील. 2 / 9हे प्रकार आरोग्यासाठी फायद्याचे तर ठरतातच शिवाय करायला सोपे असतात. व्यायामाची सवय नसलेल्यांसाठीही हे प्रकार करणे शक्य आहे. पाहा कोणते प्रकार आहेत आणि काय फायदे मिळतील. वजन राहील आटोक्यात आणि आरोग्य राहील चांगले. 3 / 9वीरभद्रासन करायला सोपे आहे. पायाच्या स्नायूंसाठी आणि हातांसाठी तसेच गुडघ्यांसाठी हा प्रकार फायद्याचा ठरेल. 4 / 9मार्जरासन करताना गुडघ्यावर बसून हात खाली टेका आणि पाठीचा भाग वर खाली करायचा. मणक्यासाठी तसेच पोटासाठी हा प्रकार फायद्याचा ठरले. बसल्याबसल्या करता येणारा साधा प्रकार आहे. 5 / 9शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी मस्त व्यायाम म्हणजे अर्धचक्रासन. करायला अगदी सोपा आहे. पाठीला आराम मिळतो. उभ्या उभ्या करता येणारा प्रकार आहे. 6 / 9महिलांसाठी बद्धकोनासन अगदी फायदेशीर आहे. झोपण्याआधी किंवा बसल्याबसल्याही महिलांनी हे आसन करायला हरकत नाही. 7 / 9उत्कटासनाला खुर्ची आसन असे ही म्हटले जाते. शरीराचा आकार खुर्ची प्रमाणे करायचा आणि स्थिर थांबायचे. हा प्रकार शरीराचे संतुलन चांगले राहावे यासाठी उपयुक्त आहे. पाठ आणि पाय दोन्हीसाठी मस्त आहे. 8 / 9पचनाची काही समस्या असेल तर रोज हस्तपादासन करणे उपयुक्त ठरेल. पोट साफ होईल. हाताने पायाची मागची बाजू धरायचा प्रयत्न करायचा. अगदी सोपा असा प्रकार आहे. 9 / 9लहान मुलांसारखे बसायचे. या आसनाला शिशुआसन असे म्हटले जाते. पाय दुमडून बसायचे आणि हात लांब करुन शांतपणे पुढच्या बाजूला वाकायचे. हा प्रकार शरीरासाठी फार आरामदायी ठरतो.