Join us
Daily Top 2 Weekly Top 5

वेटलॉससाठी पिरॅमिड वॉकिंंग करण्याचा जबरदस्त ट्रेण्ड- हे कसं करायचं आणि त्याचे काय फायदे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2025 17:30 IST

1 / 7
वेटलॉससाठी किंवा फिटनेससाठी कित्येक जण नियमितपणे वॉकिंग करतात (what is pyramid walking?). इतर कोणतेही व्यायाम करण्यापेक्षा त्यांना वॉकिंग करणे जास्त फायदेशीर वाटते.(benefits of pyramid walking)
2 / 7
पण नॉर्मल वॉकिंग करण्यापेक्षा आता पिरॅमिड वॉकिंग करण्याकडे अनेकांचा कल असून त्याचे खूप फायदे आहेत, असं एक्सपर्ट सांगतात.(how to do pyramid walking for fast weight loss?)
3 / 7
सगळ्यात आधी तर हे पाहूया की पिरॅमिड वॉकिंग म्हणजे नेमकं काय असतं.. तर नॉर्मल वॉकिंग करताना आपण एका लयीत चालत असतो. पण पिरॅमिड वॉकिंग करताना हळूहळू चालण्याची स्पीड वाढवत न्यायची नंतर काही मिनिटे त्याच जास्त स्पीडमध्ये चालायचं आणि हळूहळू पुन्हा स्पीड कमी करत आणायची.
4 / 7
याचे फायदे म्हणजे जशी जशी चालण्याची स्पीड वाढते तसं तसं मेटाबॉलिझम अधिक चांगलं हाेतं आणि जास्त कॅलरी बर्न होण्यास मदत होते.
5 / 7
चालण्याची स्पीड वाढल्यामुळे शरीरातलं रक्ताभिसरण अधिक चांगलं होतं आणि त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठीही ते फायद्याचं ठरतं. हृदयाला तसेच संपूर्ण शरीराला चांगल्या प्रमाणात ऑक्सिजन मिळतो.
6 / 7
चालण्याची स्पीड हळूहळू वाढते आणि नंतर कमी होते, यामुळे मानसिक दृष्टीनेही ते फायद्याचं ठरतं. मेंदू फ्रेश होतो आणि दिवसभर आपण ॲक्टीव्ह राहातो.
7 / 7
चालण्याची स्पीड कमी- जास्त होत असताना श्वासोच्छवासाची गतीही बदलते. त्यामुळे फुफ्फुसाच्या आरोग्यासाठीही ते फायद्याचं ठरतं.
टॅग्स : फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सव्यायाम