1 / 7आपलं वजन कमी असावं, आपण फिट मेंटेन दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. वजन कमी करण्यासाठी काय करू नी काय नको असं लोकांना होतं. (Weight Loss Tips) वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी फारसा उपयोग होत नाही. खासकरून महिलांच्या शरीरात बरेच बदल होत जातात.2 / 7 प्रेग्नंसी, हॉर्मोनल बदल यांमुळे वाढलेलं वजन कमी करणं कठीण होतं. लग्नानंतर वजन वाढल्यास बऱ्याच महिलांना हिणवलं जातं. अशाच एका महिलेची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 3 / 7जिने जवळपास १९ किलो वजन कमी केलं आहे. वजन कमी करणं हे चॅलेंजिंग आहे पण अशक्य नाही असे यावरून दिसून येते. 4 / 7पूजा या गृहिणी आहेत. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर व्हायरल झालेल्या माहितीनुसार पूजाने तिचे वजन ७६ वरून ५७ किलो केले आहे. 5 / 7दुपारी साडे बारा वाजता १२ वाजता चपातीबरोबर भाजी आणि सॅलेड खायच्या. 6 / 7संध्याकाळी ४ वाजता मिक्स फ्रुट ज्यूस प्यायच्या आणि दूधाबरोबर म्यूसली घेत होत्या. 7 / 7वेटलॉससाठी त्यांनी आहारात ग्रीन टी चा समावेश केला होता. झोपण्याआधी त्या ग्रीन टी प्यायच्या.