Join us

वजन कमी होईल, हाडंही मजबूत राहतील; रोज १० मिनिटे घरीच हा व्यायाम करा, फिटनेस सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 17:41 IST

1 / 8
व्यायामामुळे संपूर्ण शरीराला फायदे मिळतात. व्यायामाबरोबर कार्डिओ केल्यानं हाडं मजबूत राहतात याशिवाय वजनही नियंत्रणात राहतात. मजबूत हाडांसाठी धावण्याचा सल्ला दिला जातो. स्किपिंग करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही जीम इक्विपमेंट्सची गरज लागणार नाही.
2 / 8
जंपिंग रोप (Jumping Rope) हा उत्तम व्यायाम आहे. यामुळे अनेक फायदे मिळतात.(Jumping Rope Exercise Benefits) फक्त २० मिनिटं जंपिग रोप केल्यानं कॅलरी बर्न होण्यास मदत होते.
3 / 8
वजन कमी करण्यासाठी, जास्त कॅलरी बर्न करणे आवश्यक आहे. या पद्धतीचा अवलंब केल्यास वजन झपाट्याने घरबसल्या कमी करता येते आणि अतिरिक्त चरबी जाळण्यास सुरुवात होते. केवळ दोरीवर उडी मारण्याचा व्यायाम इतर व्यायामांइतकीच कॅलरी बर्न करतो.
4 / 8
रोप स्किपिंग हा देखील एक कार्डिओ व्यायाम आहे, ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. असे केल्याने हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवासाचा वेग वाढतो, ज्यामुळे हृदयाचे कार्य वाढून हृदय निरोगी होण्यास मदत होते.
5 / 8
दोरीच्या उड्या मारून शरीराची ताकदही वाढवता येते. कारण, ही संपूर्ण शरीराचा कसरत आहे, ज्याने स्नायू मजबूत होतात. खांदे, बायसेप्स, पोटाचे स्नायू, मांड्या आणि नितंब यांचे स्नायू बळकट करण्यासाठी रोज दोरी उडी मारायला हव्यात.
6 / 8
शरीराचे संतुलन बिघडल्याने दुखापतीचा धोका वाढतो. त्याच वेळी, या समस्येमुळे काही अवयवांवर अधिक ताण येतो आणि वेदना सुरू राहते. पण दोरीवर उडी मारण्याचा व्यायाम केल्याने हात, पाय आणि खोड यांच्या स्नायूंचे संतुलन सुधारते.
7 / 8
दोरीवर उडी मारण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. सर्व प्रथम, दोन्ही पाय जोडून सरळ उभे रहा. कंबर, मान, खांदे, छाती, डोके आणि गुडघे सरळ ठेवा. आता उडी मारण्याच्या दोरीची टोके दोन्ही हातात धरून, दोरी पायाच्या मागे घ्या.
8 / 8
यानंतर, हात फिरवत असताना, उडी दोरी डोक्यावर मागून समोर आणा. जेव्हा दोरी पायापर्यंत पोहोचते तेव्हा 1-2 इंच उडी मारा आणि परत जाऊ द्या
टॅग्स : त्वचेची काळजीआरोग्यहेल्थ टिप्स