By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 16:36 IST
1 / 8लव्ह हॅण्डल्स कमी करणं थोडं आव्हानात्मक असलं तरी योग्य व्यायाम आणि आहाराच्या मदतीनं ते शक्य आहे. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी काही सोपे व्यायाम पाहूया. (How To Lose Love Handles Fat Fast Female)2 / 8सायकलिंग आणि धावणे हे दोन्ही उत्तम कार्डीओ व्यायाम आहेत. ज्यामुळ संपूर्ण शरीरातील कॅलरीज जळतात आणि कमरेचा घेर कमी होतो.3 / 8बाजूच्या स्नायूंना टोन करण्यासाठी हा सर्वात प्रभावी व्यायाम आहे. एका बाजूनं शरीराचा तोल धरून किमान ३० सेकंद थांबा.4 / 8 जमिनीवर बसून पाय थोडे पाय वर उचलून धड दोन्ही बाजूंनी वळवावे. यामुळे पोटाच्या बाजूच्या स्नायूंवर ताण येतो.5 / 8कमी वेळात जास्त चरबी जाळण्यासाठी जंपिक जॅक्स किंवा बर्पीज यांसारखे व्यायाम दररोज १० ते १५ मिनिटं करावेत.6 / 8दिवसातून किमान ३ ते ४ लिटर पाणी प्या. ज्यामुळे चयापचन क्रिया सुधारते आणि विषारी घटक बाहेर पडतात.7 / 8व्यायामासोबत आहारात साखर, तळलेले पदार्थ आणि मैद्याचा वापर टाळणं अत्यंत आवश्यक आहे.8 / 8कोणतेही परिणाम मिळवण्यासाठी आठवड्यातून किमान ५ दिवस हे व्यायाम नियमित करणं गरजेचं आहे.