1 / 8लोक अनेकदा नियमित व्यायाम करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जाण्याचा विचार करतात. पण अनेकदा खूप कामं असल्याने त्यांना पुरेसा वेळच मिळत नाही. पण तुम्हाला माहित आहे का की, घरची कामं करून तुम्ही अगदी फिट राहू शकता. 2 / 8रोज व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नसला तरी घरातील विविध कामं करून कॅलरीज मोठ्या प्रमाणात बर्न करता येतात. केर काढणं, लादी पुसणं, बाथरूम स्वच्छ करणं, कपडे धुणं, खिडक्या साफ करणे ही काम केल्याने किती कॅलरीज बर्न होतात हे जाणून घेऊया...3 / 8कपडे धुताना आणि वाळवताना एखाद्या व्यक्तीला वाकावं लागतं. कपडे, बादली यासारख्या काही वस्तू उचलाव्या लागतात आणि चालावं लागतं. त्यामुळे दर तासाला १०० ते २०० कॅलरीज बर्न होतात.4 / 8बाथरूम स्वच्छ केल्याने १५० ते ३०० कॅलरीज बर्न होतात. कारण बाथरूममधील काही डाग साफ करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात आणि यामुळे फुल बॉडी वर्कआउट होतं.5 / 8संपूर्ण घरातील नीट केस काढण्यासाठी १५ ते २० मिनिटं लागतात, ज्यामुळे अंदाजे ४० ते ५० कॅलरीज बर्न होतात. हे काम दररोज करणं हा शरीरासाठी एक चांगला व्यायाम आहे.6 / 8लादी पुसल्याने स्नायूंवर परिणाम होतो. यामध्ये वाकणं देखील आवश्यक आहे, ज्यामुळे शरीराचा चांगला व्यायाम होतो. यामुळे १५० ते २५० कॅलरीज बर्न होतात.7 / 8जर तुम्ही दररोज खिडक्या साफ करायला सुरुवात केली तर दर तासाला १०० ते २०० कॅलरीज बर्न करता येतात. या कामातही उठणं, बसणं आणि हाताची देखील हालचाल होते.8 / 8घरात धूळ साचू नये म्हणून डस्टिंग केलं जातं. डस्टिंग करणं आणि त्यानंतर घरातील सर्व सामान व्यवस्थित ठेवल्याने दर तासाला १०० ते २०० कॅलरीज बर्न होतात.