Join us
Daily Top 2 Weekly Top 5

रोज १० हजार पाऊलं चालल्यानं नेमकं किती किलोमीटर चालण्याचा व्यायाम होतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 13:06 IST

1 / 7
रोज १० हजार पाऊलं चालणं जवळपास ७.५ ते ८ किलोमीटरइतकं असतं. प्रत्येक व्यक्तीसाठी हे अंतर वेगवेगळं असतं. कारण तुमची उंची आणि पाऊलांची संख्या यावर ते अवलंबून असते. (Health How Many Kilometers Is it To Walk 10 k Steps A Day)
2 / 7
पुरूषांसाठी जवळपास ७.८ ते ८ किलोमीटर असते कारण पुरूषांची पाऊलं लांब पडतात. तर महिलांसाठी ते जवळपास ६.२ किंवा ७.२ किलोमीटर असू शकते. (How Many Kilometers Make 10k Steps)
3 / 7
१० हजार पाऊलं रोज चालणं हृदय निरोगी ठेवण्यासाठी तसंच मानसिक आरोग्याच्या शांततेसाठी गरजेचे असते.
4 / 7
रोज सरासरी १० हजार पाऊलं चालल्यामुळे शरीरातील सुमारे ३०० ते ५०० कॅलरीज जळतात जर तुम्ही योग्य आहारासोबतच हे सातत्य ठेवले तर वजन कमी करणं आणि चरबी जाळणं सोपं जातं.
5 / 7
चालण्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयाचे स्नायू बळकट होतात. यामुळे उच्च रक्तदाब आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.
6 / 7
चालण्यामुळे शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. टाईप 2 डायबिटीसच्या रुग्णांसाठी हे फायदेशीर ठरते.
7 / 7
नियमित चालण्यामुळे पायांचे स्नायू टोन होतात आणि हाडांची घनता वाढते. यामुळे भविष्यात होणारा ऑस्टिओपोरोसिस किंवा सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स