Join us   

पोट सुटलंय, व्यायामाला वेळ नाही? बेडवर पडल्या पडल्या ३ योगासनं करा-पोट होईल एकदम फ्लॅट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 1:19 PM

1 / 6
सध्याच्या धावपळीच्या जीवनात वजन कमी करण्यासाठी किंवा मेटेंन राहण्यासाठी व्यायाम करण्याची कितीही इच्छा असेल तर बऱ्याच लोकांना वेळ मिळत नाही. घरातील काम, ऑफिच्या वेळा या सगळ्यातून जीम किंवा योगाला जाण्यासाठी वेळ काढणं कठीण होतं. (Simple at home exercises to lose your belly fat)
2 / 6
अशावेळी अंथरूणात पडल्या पडल्या तुम्ही सोपे व्यायाम प्रकार करू शकता. (Easy Exercise For Belly Fat at Home)ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होईल. योगासनांमुळे मन आणि शरीर दोन्ही निरोगी राहतात. जीमला, योगा सेशन्सला न जाता तुम्ही घरच्याघरी हे व्यायाम करू शकता.
3 / 6
वज्रासन एक सोपी सिटिंग योगा पोज आहे. संस्कृतातील वज्र या शब्दावरून हे नाव पडलं आहे. ही पोज करण्यासाठी तुम्ही गुडघे जमीनीला टेकवा. त्यानंतर गुडघ्यांवर वजन पडू नये यासाठी पाय दुमडून बसा हे आसन केल्यानं वजन कमी होईल आणि पोटाचे स्नायू मजबूत राहण्यास मदत होईल.
4 / 6
पश्चिमोत्तासन हे आसन तुम्ही अंथरूणात पडल्या पडल्या आरामात करू शकता हे आसन फॅट्स कमी करण्यास महत्वाची भूमिका बजावते. डायबिटीसच्या रुग्णांसाठी देखील हे आसन फायदेशीर ठरते. यामुळे आजारांपासून लढण्याची शक्ती मिळते. हे आसन शरीरातील इंसुलिनचचे उत्पादन वाढते.
5 / 6
हे एक सोपं योगासन आहे. अंथरूणात पडल्या पडल्या तुम्ही आसन कर शकता. पोटाची चरबी कमी करण्यासाठी तसेच मेटाबॉलिझ्म बुस्ट करण्यासाठी हे एक उत्तम आसन आहे. या आसनाला चाईल्ड पोज असंही म्हटलं जातं. यामुळे पाय मजबूत राहतात.
6 / 6
या तीन व्यायामांशिवाय तुम्ही घरच्याघरी सुर्यनमस्कार, जंपिंग जॅक, शोल्डर टॅप असे सोपे व्यायाम करून एक्टिव्ह राहू शकता.
टॅग्स : वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य