दीपिका पादूकोण ते आलिया भट-रोज सकाळी उपाशी पोटी ‘हे’ काय खास पितात पाहा - दिसतात मेंटेन्ड, ग्लोइंग...
Updated:April 10, 2026 19:05 IST2026-04-10T19:00:20+5:302026-04-10T19:05:01+5:30
actresses morning secret drinks for fitness & glowing skin : celebrity secret drinks for fitness & skin glow : वेटलॉस होऊन फिगर मेंटेन्ड दिसावी, स्किन ग्लो वाढावा म्हणून, दीपिकापासून आलियापर्यंत सगळ्याच पितात स्पेशल ड्रिंक...

actresses morning secret drinks for fitness & glowing skin
बॉलिवूड अभिनेत्रींना पडद्यावर नेहमीच फिट, ग्लोइंग आणि स्लिम-ट्रिम पाहताना आपल्याला प्रश्न पडतो की, त्या स्वतःला इतक्या परफेक्ट फिट आणि मेंटेन्ड कशा काय ठेवतात? सततच्या शूटिंग शेड्यूलमध्येही त्या स्लिम-ट्रिम, ग्लोइंग आणि एनर्जेटिक दिसतात, यामागे त्यांचे डाएट आणि लाईफस्टाईल खूप महत्त्वाची भूमिका बजावते. विशेष म्हणजे, दिवसाची सुरुवात त्या अतिशय हेल्दी आणि नॅचरल घरगुती ड्रिंक्स पिऊन करतात.
celebrity secret drinks for fitness & skin glow
तासंतास जिममध्ये घाम गाळण्यासोबतच, त्यांच्या या फिटनेस रुटीनमध्ये त्यांच्या मॉर्निंग रुटीनचा मोठा वाटा असतो. दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने करण्याऐवजी, या अभिनेत्री काही खास 'नॅचरल होममेड ड्रिंक्स' पिण्याला पसंती देतात. ही ड्रिंक्स केवळ शरीरातील फॅट्स कमी करत नाहीत, तर चेहऱ्यावर नैसर्गिक चमकही आणतात.
what do actresses drink in the morning for fitness & glowing skin
ही मॉर्निंग ड्रिंक्स शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करतात, मेटाबॉलिझम वाढवतात आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासही उपयोगी ठरतात. त्यामुळेच बॉलिवूड अभिनेत्री रोज सकाळी काही खास ड्रिंक्सचा समावेश त्यांच्या रूटीनमध्ये करतात, ज्यामुळे त्यांची फिटनेस आणि सौंदर्य दोन्ही टिकून राहते.
१. दीपिका पदुकोण :-
दीपिका पदुकोण आपल्या केसांना दाट आणि त्वचेला नैसर्गिक चमक देण्यासाठी पुदीना, हळद, कडूलिंबाची पाने, कडीपत्ता आणि बीटरूट यांना एकत्र करून त्याचा ज्यूस तयार करते आणि तो नियमितपणे पिते.
२. कतरिना कैफ :-
कतरिना कैफ सकाळी उठताच सर्वात आधी गरम पाणी पिते. त्या पाण्यात कधी लिंबाचा रस तर कधी आल्याचा रस मिसळून पिते. विशेष म्हणजे ती हे मॉर्निंग रुटीन कधीच चुकवत नाही. हे पाणी प्यायल्यानंतरच ती कोणतीही एक्सरसाइज सुरू करते.
३. मलायका अरोरा :-
फिटनेस क्वीन मलायका अरोरा ५० व्या वर्षातही २५ वर्षांच्या तरुणीइतकीच सुंदर दिसते. ती सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी जिरे, ओवा आणि बडीशेपचं पाणी पिते. हे सगळे घटक आधी हलकेसे भाजून रात्रभर पाण्यात भिजत ठेवले जातात. सकाळी ते पाणी थोडं गरम करून त्यात लिंबाचा रस घालून ती पिते.
४. शिल्पा शेट्टी :-
फिटनेस एक्सपर्ट शिल्पा शेट्टी तिच्या टोन्ड फिगरसाठी फारच फेमस आहे. शिल्पा तूप - हळद - काळीमिरीची [पूड कोमट पाण्यात मिसळून ते औषधी व हेल्दी ड्रिंक पिऊन दिवसाची सुरुवात करते.
५. अंकिता लोखंडे :-
अंकिता लोखंडेने सांगितले की, सकाळी उठल्यावर ती दीड ते दोन लीटर वेगवेगळ्या प्रकारचे पाणी पिते. अभिनेत्री सर्वात आधी एक ग्लास मेथी दाण्यांचे पाणी पिते. त्यानंतर ओवा - जीरे - बडीशेपच्या पावडरचे पाणी पिते, त्यासोबतच ती शुद्ध कोरफडीचा गर कापून खाते आणि एक लसूण पाकळी ठेचून खाते. यानंतर ती केशरचे पाणी पिते. अंकिताने सांगितले की, याशिवाय ती आणखी एक 'मॅजिक ड्रिंक' देखील पिते. नारळ पाणी, बीट, गाजर, डाळिंब, आवळा, कच्ची हळद आणि डिंक हे सर्व एकत्र करून ती एक ड्रिंक तयार करते, जे दिवसभर तिला इन्स्टंट एनर्जी देते.
६. सोहा अली :-
सोहा अली खानने सांगितले की, ती आधी सकाळी रिकाम्या पोटी कॉफी प्यायची, पण आता तिने तिचे मॉर्निंग रुटीन बदलले आहे. आता ती कोमट पाण्यात हळद, आले, चिया सीड्स आणि पिंक सॉल्ट (सेंधव मीठ) मिसळून पिते. यामुळे तिच्या पचनसंस्थेचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते.
७. नेहा धुपिया :-
नेहा धुपियाने सांगितले की, ती पचन संस्थेचे कार्य सुरळीत चालण्यासाठी कच्ची हळद, आले, काळीमिरी आणि काळे जिरे एकत्र दळून त्याचे आइस क्यूब बनवून ठेवते. त्यानंतर दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक आइस क्यूब गरम पाणी आणि एक चमचा ऑलिव्ह ऑइल किंवा तूप यामध्ये मिसळून पिते.
८. आलिया भट्ट :-
आलियाने सांगितले की, आधी ती खूप कॉफी प्यायची, पण ती सोडून आता ती गरम पाण्यात लिंबाचा रस घालून पिते. सकाळी उपाशी पोटी हे ड्रिंक पिणे खूप फायदेशीर असते.