1 / 9सध्या वाढतं वजन, कमी वयातच हृदयविकार, बीपी, शुगर, कोलेस्टेरॉल असे आजार होण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. हे सगळं टाळायचं असेल आणि स्वत:सोबतच अख्ख्या कुटूंबालाही निरोगी, सुदृढ ठेवायचं असेल तर या काही सवयी स्वत:ला लावून घ्या.2 / 9स्वत:ला आणि घरातल्या प्रत्येकाला जेवणाच्या आधी सॅलाड खाण्याची सवय लावा. तसेच जेवणात पोळी, चपातीचे प्रमाण कमी करून डाळ, भाजी यांचे प्रमाण वाढवा.3 / 9घाई गडबडीत, मोबाईल किंवा टीव्ही पाहात जेवण करणं टाळा. प्रत्येक घास शांतपणे चावून खा. जेवणावर लक्ष केंद्रित करा. यामुळे ओव्हरइटिंग टाळलं जातं. 4 / 9बाजारात मिळणाऱ्या डाएट फूड, हेल्थ ज्यूस यांच्यापासून दूर राहा. पारंपरिक पद्धतीने घरी जो स्वयंपाक करतात, तोच खाण्यावर भर द्या.5 / 9बाहेरचे पदार्थ खाणं टाळा. घरी जेवण्याचे प्रमाण वाढवा.6 / 9तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा रोस्ट, ग्रील, शिजवलेले, बेक केलेले पदार्थ खाण्यावर भर द्या. 7 / 9आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवा. लहान मुलांनाही लहानपणापासूनच प्रोटीन्स खाण्याची सवय लावा.8 / 9दररोज एखादे फळ खायचेच हे ठरवून घ्या आणि फळांचा ज्सूस पिण्याऐवजी फळं चावून खाण्याला प्राधान्य द्या. 9 / 9रोज कोणता ना कोणता व्यायाम न चुकता करा. घरातल्या लहान मुलांना तसेच वयस्कर व्यक्तींनाही त्यांना जमेल तसे व्यायाम रोज करायला लावा.