By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 16:01 IST
1 / 9पाठीची चरबी बऱ्याच जणांमध्ये वाढलेली दिसून येते. बॅक ब्रा फॅट कमी करणं ही एक प्रक्रिया आहे. ज्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम यांचा मेळ घालणं आवश्यक असतं. हे फॅट कमी करण्यासाठी काही उपाय फायदेशीर ठरतील. (8 Pro Tips To Reduce Back Bra Fat)2 / 9 शरीरातील एकूण चरबी कमी करण्यासाठी सायकलिंग,वेगानं चालणं, पोहणं किंवा धावणं यांसारखे कार्डीओ व्यायाम रोज किमान ३० मिनिटं तरी करावेत. (How To Loss Back Bra Fat)3 / 9पाठीच्या स्नायूंना टोन करण्यासाठी डंबेल रो लॅट पूलडाऊन आणि पूश अप्स यांसारखे व्यायाम आठवड्यातून तीन वेळा करा.4 / 9 धनुरासन, भुजंगासन आणि मार्जरी आसन नियमित केल्यानं पाठीचे स्नायू लवचिक होतात आणि तिथली चरबी कमी होण्यास मदत होते.5 / 9आहारात प्रथिनयुक्त पदार्थ वाढवा. साखर किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ तसंच तेलकट अन्नपदार्थ खाणं टाळा. 6 / 9 वजन कमी करण्यासाठी तुम्ही दिवसभरात जितक्या कॅलरीज घेता त्यापेक्षा जास्त कॅलरीज जाळण्यावर अधिक भर द्या.7 / 9शरीराच्या रिकव्हरीसाठी आणि हॉर्मोन्सच्या संतुलनासाठी ७ ते ८ तासांची झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे.8 / 9अनेकदा चुकीच्या मापाची ब्रा घातल्यानंही बॅक फॅट उठून दिसतं. त्यामुळे तुमच्या शरीराच्या आकारानुसार योग्य फिटिंगची ब्रा निवडा.9 / 9शरीरातील चयापचन क्रिया सुधारण्यासाठी आणि विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी दिवसातून किमान ३ ते ४ लिटर पाणी प्या.