Join us
Daily Top 2 Weekly Top 5

पोटाचा घेर वाढला-फिगर बेढब दिसते? १५ सोपे उपाय, पोट कमी झालेलं दिसेल काहीच दिवसांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 16:15 IST

1 / 15
पोटाची चरबी (Belly Fat) कमी करणं हे केवळ सौंदर्यासाठीच नाही तर आरोग्यासाठी खूपच महत्वाचे आहे. खाली पोटाचा घेर कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी असे १५ उपाय आहेत. (15 Pro Tips For Belly Fat Lose)
2 / 15
साखरेमुळे शरीरात इन्सुलिन वाढते आणि पोटावर चरबी जमा होते. सोडा, कोल्ड ड्रिंक्स आणि मिठाईपासून दूर राहा.
3 / 15
दिवसभरातून कमीत कमी ३ ते ४ लिटर पाणी प्या. जेवणाआधी अर्धा तास पाणी प्यायल्यानं भूक कमी लागते.
4 / 15
आहारात पनीर, डाळी, कडधान्यांचा समावेश करा. प्रोटीन्समुळे पोट जास्तवेळ भरलेलं राहतं.
5 / 15
पालेभाज्या, फळं आणि ओट्स यांसारख्या फायबर्सयुक्त पदार्थांचा समावेश करा ज्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते.
6 / 15
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू आणि मध घालून प्यायल्यानं शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.
7 / 15
चालणं, धावणं सायकलिंग किंवा पोहणं यासारखे व्यायाम कॅलरीज वेगानं कमी करतात.
8 / 15
रोज कपालभाती, नौकासन, भुजंगासन आणि प्लँक केल्यानं पोटाच्या स्नायूंवर ताण येतो.
9 / 15
कमी वेळात जास्त घाम गाळल्यानं पोटाचा घेर लवकर कमी होण्यास मदत होते. कामाच्या ठिकाणी किंवा घरी पायऱ्या चढल्यानं शरीराची चांगली हालचाल होते.
10 / 15
दिवसाला ७ ते ८ तासांची झोप घ्या. अपूऱ्या झोपेमुळे शरीरात कोर्टिसोल हॉर्मोन वाढते ज्यामुळे वजन वाढतं.
11 / 15
जास्त ताण घेतल्यावर पोटावर चरबी साठते. यासाठी ध्यान करणं गरजेचं आहे. कमीत कमी ताण घ्या. तब्येतीवर जास्त लक्ष द्या.
12 / 15
झोपण्यापूर्वी किमान २ ते ३ तास आधी जेवा. रात्रीचं जेवण हलकं असावं. जास्त तेलकट खाल्ल्यानं वजन वाढू शकतं.
13 / 15
जेवण झाल्यावर किमान १५ ते २० मिनिटं संथ गतीनं चाला. पोटाची चरबी एका दिवसांत कमी होण्यास मदत होते.
14 / 15
आहारात कमीत कमी मिठाचा समावेश करा. जास्त मिठामुळे चरबी वाढू शकते.
15 / 15
पोट कमी सोपे पोटाचे व्यायाम घरच्याघरी करू शकता. ज्यामुळे शरीर हलकं राहील. तसंच गोड पदार्थ रात्रीच्यावेळी खाणं टाळा.
टॅग्स : वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहेल्थ टिप्स