By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 12:38 IST
1 / 11आजपासून व्यायाम सुरू करणं हा तुमच्या आयुष्यातील सर्वात उत्तम निर्णयांपैकी एक ठरू शकतो. व्यायाम केल्यानं शरीरात काय बदल होतात समजून घेऊ. (What Happens When You Start Exercising)2 / 11नियमित व्यायामामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. ज्यामुळे तुम्हाला दिवसभर ताजंतवानं आणि उत्साही वाटते. (10 Benefits Of Regular Physical Activity)3 / 11 व्यायामामुळे शरीरातील एंडोर्फिनसारखी आनंदी संप्रेरके तयार होतात. ज्यामुळे ताण-तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होण्यास मदत होते.4 / 11दररोज घाम गाळल्यानं शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते आणि तुम्ही वारंवार आजारही पडत नाही.5 / 11व्यायामामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. ज्यामुुळे वजन आटोक्यात राहतं आणि शरीर सुडोल होण्यासही मदत होते.6 / 11धावणं, चालणं किंवा सायलकिंग यांसारखे व्यायाम केल्यानं हृदयाचे स्नायू बळकट होतात आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.7 / 11 ज्या दिवशी तुम्ही शरीरीरिक कष्ट करता. त्या दिवशी शांत आणि गाढ झोप लागते. ज्यामुळे मेंदूला विश्रांती मिळते.8 / 11 वाढत्या वयानुसार होणारी हाडांची झीज थांबवण्यासाठी आणि स्नायूंचा कडकपणा कमी करण्यासाठी व्यायाम अत्यंत आवश्यक आहे.9 / 11जेव्हा तुमचे शरीर निरोगी आणि फिट दिसू लागते तेव्हा तुमचा स्वत:बद्दलचा आत्मविश्वास आपोआप वाढू लागतो.10 / 11व्यायामाच्या निमित्तानं सकाळी लवकर उठणं आणि वेळेचं नियोजन करणं यामुळे आयुष्यात एक प्रकारची शिस्त येते.11 / 11संधोधनानुसार जे लोक नियमित व्यायाम करतात त्यांचे आयुष्य व्यायामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकांपेक्षा जास्त सुखकर आणि दीर्घ असते.