Join us
Daily Top 2Weekly Top 5

लहान बाळांची पापी घेण्याचा मोह टाळा, गंभीर इन्फेक्शनचा मुलांना होतोय त्रास-बाळांच्या जीवाशी खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 17:00 IST

Side Effect Of Kissing Newborns : आपले लाड एखाद्या बाळासाठी गंभीर आजाराचं कारण ठरू शकतात. अशात पालकांनी सुद्धा आपल्या बाळांना किस करण्याचा मोह टाळला पाहिजे. 

Side Effect Of Kissing Newborns : चिमुकल्या गोंडस बाळांना पाहिलं तर त्यांचे लाड करण्याचा मोह कुणालाही आवरत नाही. पालकांपासून ते नातेवाईकांपर्यंत सगळेच बाळांना किस करतात. किस करणं ही प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे, पण मेडिकल सायन्समध्ये याला क्यूट अग्रेशन असं म्हटलं जातं. आपल्याला कदाचित कल्पना नसेल की, लहान बाळांना किस करणं त्यांच्यासाठी मोठं घातक ठरू शकतं. आपले लाड एखाद्या बाळासाठी गंभीर आजाराचं कारण ठरू शकतात. अशात पालकांनी सुद्धा आपल्या बाळांना किस करण्याचा मोह टाळला पाहिजे. 

ब्रिटनचे प्रसिद्ध डॉक्टर सरमद मेज यांनी इन्स्टाग्रामवर याबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यातून त्यांनी लोकांना इशारा दिलाय. ते सांगतात की, लहान बाळांची पापी घेऊ नये  जर असं केलं तर बाळ आयुष्यभर घातक व्हायरसचा शिकार होऊ शकतं. आपल्या ओठांच्या आजूबाजूला येणारी पुरळ म्हणजे कोल्ड सोर मुळात हर्पीज सिम्प्लेक्स व्हायरस टाइप - १ मुळे होते. हा एक फारच घातक व्हायरस आहे. जो त्वचा किंवा लाळेच्या माध्यमातून पसरतो. याची सगळ्यात गंभीर बाब म्हणजे एकदा शरीरात प्रवेश केल्यानंतर तो कधीही नष्ट होत नाही. उपचार करून याचे घाव तर भरतात, पण व्हायरस मणक्याच्या तंत्रिका तंत्रात जाऊन लपतो आणि इम्यूनिटी कमजोर झाल्यावर पुन्हा सक्रिय होतो.

बरेच लोक असा विचार करतात की, त्यांच्या ओठांवर कोणतीही जखम किंवा पुरळ नाही, त्यामुळे सुरक्षित आहेत. पण डॉक्टरांनी एसिम्प्टोमॅटिक शेडिंग नावाच्या प्रक्रियेबाबत इशारा दिला आहे. याचा अर्थ हा आहे की, व्हायरस कोणतंही लक्षण न दाखवता, कोणतीही जळजळ न होता किंवा घाव नसतानाही त्वचेवर आणि लाळेत असू शकतो. अशात व्यक्तीला कळतही नाही ते इन्फेक्शन पसरवत आहे. 

 

हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, वयस्कांसाठी हर्पीज व्हायरस एक सामान्य स्किन समस्या असू शकते, पण बाळांसाठी ही घातक ठरू शकते. बाळांची इम्यूनिटी डेव्हलप होण्याचा प्रक्रिया सुरू असते. अशात त्यांचं शरीर व्हायरससोबत लढण्यास सक्षम नसतं. जगातील साधारण दोन तृतियांश म्हणजे ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोक हा व्हायरस घेऊन फिरत आहेत. त्यामुळे एखाद्या बाहेरच्या व्यक्तीने बाळाला किस केल्यास बाळाला व्हायरसची लागण होते. ज्याच्यासोबत लढण्यासाठी त्यांची चिमुकलं शरीर तयार नसतं.

जेव्हा एखाद्या बाळाला HSV-1 व्हायरसचं इन्फेक्शन होतं, तेव्हा त्याला निओेनेटल हर्पीज म्हटलं जातं. बाळांचं शरीर व्हायरसला एका जागेवर स्थिर ठेवू शकत नाही, त्यामुळे हे इन्फेक्शन वेगाने त्यांचा मेंदू आणि इतर अवयवांमध्ये पसरतो. ज्यामुळे मेंदूवर सूज येऊ शकते आणि अवयवही निकामी होऊ शकतात. काही गंभीर केसेसमध्ये हे इन्फेक्शन बाळांसाठी जीवघेणं देखील ठरू शकतं. त्यामुळे मुलांना किस करणं टाळलं पाहिजे. महत्वाची बाब म्हणजे हे इन्फेक्शन केवळ किस केल्याने नाही तर भांडी किंवा टॉवेल शेअर केल्यानेही पसरू शकतं.

English
हिंदी सारांश
Web Title : Avoid kissing newborns; it can cause serious herpes infection.

Web Summary : Kissing newborns can transmit the herpes virus, potentially causing neonatal herpes. Infants' immune systems are vulnerable, leading to brain swelling and organ failure. Avoid kissing babies and sharing utensils.
टॅग्स :पालकत्वहेल्थ टिप्सआरोग्य