Children Height Tips : आपणही आपल्या घरात अनुभवलं असेल किंवा नातेवाईकांकडून ऐकलं असेल की, एका ठराविक वयानंतर मुलं-मुलींची उंची वाढणे बंद होते. काही लोक मुला-मुलींची उंची वाढावी म्हणून त्यांना वेगवेगळ्या अॅक्टिविटी करायला लावतात. यासोबतच जर आणखी एक गोष्टी केली तर त्यांची उंची योग्य प्रमाणात वाढण्यास मदत मिळू शकेल. अशाच एका पोषक तत्वाबाबत आम्ही आपल्याला सांगणार आहोत, ज्याचा आहारात समावेश केला तर नक्कीच फायदा होईल.
व्हिटामिन डीचे महत्त्व
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या एका अहवालानुसार, शरीरात व्हिटामिन डीची कमतरता असल्यास मुलांची उंची वाढणे थांबू शकते. हेल्थ एक्सपर्ट सांगतात की जेव्हा शरीरात या व्हिटामिनची तीव्र कमतरता होते, तेव्हा हाडं कमकुवत होतात आणि याचा लहान मुलांच्या वाढीवर परिणाम होतो.
व्हिटामिन डीच्या कमतरतेचे दुष्परिणाम
- हाडं कमकुवत होतात आणि त्यांची वाढ थांबते
- मुलांमध्ये रिकेट्स आणि मोठ्यांमध्ये फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो
- स्नायूंमध्ये कमजोरी, थकवा आणि डिप्रेशनसारख्या समस्या उद्भवू शकतात
व्हिटामिन डीची कमतरता कशी टाळावी?
दररोज सकाळी काही वेळ सूर्यप्रकाशात बसा. हा व्हिटामिन डीचा सर्वोत्तम स्रोत आहे. सोया दूध आणि संत्र्याचा रस देखील व्हिटामिन डीचे उत्तम स्रोत आहेत.
फायदे
व्हिटामिन डीमुळे केवळ मुलांची उंची वाढण्यास मदत होत नाही, तर त्यांच्या स्नायूंच्या कार्यक्षमतेवर आणि एकूणच वाढीवरही सकारात्मक परिणाम होतो.