Join us

नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 13:09 IST

आजच्या काळात बाजारात विविध प्रकारचं तेल उपलब्ध आहे. त्यामुळे नवजात बाळासाठी नेमकं कोणतं तेल चांगलं आहे? असा प्रश्न हमखास पडतो.

नवजात बाळाची नीट काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मऊ त्वचेला योग्य प्रकारे मालिश करणं हे बाळाच्या विकासासाठी आवश्यक असतं. पण आजच्या काळात बाजारात विविध प्रकारचं तेल उपलब्ध आहे. त्यामुळे नवजात बाळासाठी नेमकं कोणतं तेल चांगलं आहे? असा प्रश्न हमखास पडतो. बालरोगतज्ञ डॉ. इम्रान पटेल यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे, त्याबद्दल जाणून घेऊया...

नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं?

- रक्ताभिसरण सुधारतं

- हाडं आणि स्नायू मजबूत होतात

- बाळ शांत झोपतं

- आई आणि बाळामधील बंध अधिक घट्ट होतो

कोणतं तेल वापरावं?

नारळाचं तेल

नारळाचं तेल हे हलकं, लवकर शोषलं जाणारं आणि अँटीबॅक्टीरियल  गुणधर्मांनी समृद्ध असल्याने ते उन्हाळ्यात सर्वात योग्य आहे. ड्राय स्क्रिन आणि रॅशेसवर देखील फायदेशीर आहे.

बदाम तेल

बदामाचं तेल हेव्हिटॅमिन ई ने समृद्ध असून ते त्वचेला पोषण देतं. हे तेल हिवाळ्यात त्वचेला मॉइश्चरायझ करतं. त्याचा सुगंध सौम्य असतो आणि हे तेल चिकट नसतं.

मेडिकेटेड बेबी ऑईल्स

बाजारात फॉर्म्युलेटेड बेबी ऑईल्स उपलब्ध आहेत. परंतु डॉक्टरांनी सुचवलेले पर्यायच निवडा.

बाळाला मालिश करताना 'हे' ठेवा लक्षात

- नेहमी थोड्या उबदार खोलीत मालिश करा

- तेल हलकं गरम केल्यानंतर लावा

- बाळाच्या त्वचेवर काही प्रतिक्रिया दिसल्यास तेल ताबडतोब बदला

- प्रत्येक नवीन तेलाची प्रथम पॅच टेस्ट करा

प्रत्येक बाळ वेगळं असतं आणि त्याच्या त्वचेच्या गरजा देखील वेगळ्या असतात. म्हणून योग्य तेल निवडणं खूप महत्त्वाचं आहे. पालकांनी ब्रँड किंवा दिखाव्याच्या मागे न धावता आणि तेलाची शुद्धता, हंगामी योग्यता आणि बाळाची त्वचा लक्षात घेऊन निर्णय घ्यावा.

टॅग्स :पालकत्वआरोग्यहेल्थ टिप्स