- कोमल दामुद्रे
धावत शहरं, ट्रेनची गर्दी, ट्रॅफिक, बॉसचा ओरडा, कामाचं टार्गेट आणि दोन जोडप्यांनी रंगवलेलं सुखी संसाराच स्वप्नं. यशाच्या शिखरावर असताना अचानक कोणी तरी आपल्याला उंचावरून खाली लोटून द्यावं अशीच काहीशी परिस्थिती.(Ribbon Movie Story) लग्न झालं आणि आई होण्याची गोड बातमी समजली, पण बातमी ऐकून आनंद होण्याऐवजी तिच्या मनात काहूर माजलं. दोघांनाही करिअर घडवायचं होतं, घराचे हफ्ते फेडायचे होते, स्वत:च अस्तित्व तयार करायचं होतं पण त्याला बाप व्हायचं असतं.(Work-life balance for parents) तिची सहमती नसली तरी त्याच्या आग्रहाखातर तिने दिलेली मूक संमती त्याच्या आनंदात भर घालते. पण या साऱ्यात तिचं करिअर मागे पडतं जातं.(Ribbon film kalki koechlin) त्याच एक्स्ट्रा काम करणं आणि तिच काहीही झालं तरी आपलं करिअर न सोडण्याचा अट्टाहास. सहाना आणि करण यांची ही गोष्ट.(Child-parent emotional gap)
कल्की कोचलिन आणि सुमित व्यास यांचा रिबन या सिनेमाची ही कथा असली तरी ही कथा तशी आपल्या अवतीभोवती हल्ली घडताना दिसते. करिअर जबाबदाऱ्या की मूल, घराचे हप्ते, नोकरीतल्या संधी की मूल झाल्यानंतर स्लो डाऊन करणं असे अनेक प्रश्न छळतात. त्या प्रश्नांचंच एक अस्वस्थ चित्र म्हणजे हा सिनेमा.(Ribbon Movie)
सहानाच्या मनात अनेक प्रश्न असतात. बाळाचं संगोपन करण्यातच आपलं आयुष्य निघून जाईल का हा प्रश्न तिला वारंवार सतावू लागतो. कंपनीत रिजॉइन झाल्यानंतर मिळालेली वागणूक, नात्यांचं भविष्य आणि पदरी पडलेली जबाबदारी मनात सल निर्माण करते. या साऱ्यात आपण पुन्हा शून्यातून उभं राहू शकू का हा प्रश्न तिला सतावू लागतो. वाढत्या वयात नव्याने जॉब शोधणं थोडं कठीणचं. तिच्या मातृत्वावर अनेक प्रश्न चिन्ह उभे राहतात. तरीही ती न डगमगता पुन्हा तितक्याच जोमाने उभी राहते. पण सारंच काही चांगलं घडत नाही, सिनेमाचा शेवट सारं आनंदात होईल असं न झाल्यानं आपल्यालाही काही प्रश्न छळतात.. अस्वस्थ करतात.
पालक किंवा जोडीदार म्हणून आपल्या जबाबदाऱ्या किती वाढतात. एकमेकांच्या मनात सुरु असलेला गोंधळ बोलूनही दाखवता येत नाही. करिअर घडवण्याच्या नादात आपल्याच लेकराकडे दुर्लक्ष होतंय हे ही चटकन कळत नाही आणि लहानग्या जीवाच्याही जगण्याचे प्रश्न तयार होतात.
सततच्या धावपळीच्या जगात ज्या मुलांसाठी आपण पैसे कमावतोय, त्यांच्या करिअरला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करतोय, ती सुरक्षित आहेत का? याचा पालक म्हणून नीट विचार केला जातो का?
मुलांचं संगोपन करताना आपल्या मुलांचं सुख, आनंद कशात आहे हे देखील पालक म्हणून आपण विसरतोय. ज्यांच्यासाठी आपण पैसे कमावतो त्यांना आपल्याविषयी प्रेम, माया, आपुलकीचं नसेल तर? पालक म्हणून आपण आपल्या मुलांना किती वेळ देतो. बदलत्या पिढीनुसार आपल्याला त्यांच्यासोबत जुळवून घेता येईल का? आपण त्यांचे चांगले आई-वडील होऊ पण मित्र-मैत्रिणीची ती घट्ट वीण आपल्याला विणता येईल का? त्यांच्यावर संस्कार करताना ते योग्यप्रकारे होताय ना हे देखील पालकांनी पाहायला हवं. या सिनेमाच्या निमित्ताने असे अनेक प्रश्न प्रेक्षक म्हणून आपल्यालाही पडतातच. वास्तव अचानकच अंगावर यायला लागतं, सिनेमा असूनही!