Lokmat Sakhi >Parenting > मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी प्रभावी पर्याय, अभ्यासाची लागेल गोडी सहज, वाटेल आनंद

मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी प्रभावी पर्याय, अभ्यासाची लागेल गोडी सहज, वाटेल आनंद

tips for parents, Effective options to increase children's memory, study will be easy and enjoyable : मुलांना आवड लागेल अभ्यासाची. पण पालकांनी लक्षात ठेवा या गोष्टी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2025 15:08 IST2025-07-03T15:07:26+5:302025-07-03T15:08:35+5:30

tips for parents, Effective options to increase children's memory, study will be easy and enjoyable : मुलांना आवड लागेल अभ्यासाची. पण पालकांनी लक्षात ठेवा या गोष्टी.

tips for parents, Effective options to increase children's memory, study will be easy and enjoyable | मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी प्रभावी पर्याय, अभ्यासाची लागेल गोडी सहज, वाटेल आनंद

मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी प्रभावी पर्याय, अभ्यासाची लागेल गोडी सहज, वाटेल आनंद

लहान मुलांना अभ्यास लक्षात ठेवण्यात अडचणी येणे ही एक सामान्य समस्या आहे. यामागे विविध कारणे असू शकतात आणि योग्य उपायांनी ही समस्या कमी करता येते. (tips for parents, Effective options to increase children's memory, study will be easy and enjoyable)लहान मुलांची क्षमता ओळखूनच त्यांना शिकवणे गरजेचे असते. त्यामुळे पालकांनी जबरदस्ती न करता मुलाचा कल ओळखणे जास्त फायद्याचे ठरेल.  

१. एक महत्त्वाचे कारण म्हणजे मुलांचे लक्ष विचलित होणे. आजच्या आधुनिक युगात मोबाइल, टेलिव्हिजन आणि गेम्स यामुळे मुलांचे लक्ष अभ्यासावर केंद्रित राहणे कठीण होते. त्यांचे मन एआयच्या जगात जास्त रमते.   मुलांना अभ्यास करताना शांत वातावरण देणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी त्यांना उपकरणे वापरण्यावर नियंत्रण ठेवायला शिकवणे महत्त्वाचे आहे. थोडे नियम लावणे उपयुक्त ठरेल. जास्त वेळ मोबाइल देऊ नका. लहान मुलांना तर सवयच लावायची नाही. न वापरणेच उत्तम.

२. अभ्यासाची पद्धत फार महत्त्वाची ठरते. फक्त पाठांतरावर भर दिल्यास माहिती दीर्घकाळ लक्षात राहत नाही. त्याऐवजी गोष्टी समजून घेणे, उदाहरणासह शिकणे आणि नियमित पुनरावृत्ती करणे हे अधिक प्रभावी ठरते. फक्त घोकमपट्टी करुन घेऊ नका. समजावून सांगा. 

३. मुलांच्या आहाराचाही स्मरणशक्तीवर नक्कीच परिणाम होतो. संतुलित आहार ज्यात फळे, भाज्या, प्रथिने आणि योग्य प्रमाणात असते तेच अन्न खावे. ते मेंदूच्या विकासासाठी आवश्यक आहे. अयोग्य आहारामुळे थकवा आणि एकाग्रतेचा अभाव निर्माण होऊ शकतो. मुलांना जास्त जंक फुड देऊ नका. पर्यायी पदार्थ घरी करा. 

४. झोपेचा अभाव देखील स्मरणशक्तीवर परिणाम करतो. मुलांना पुरेशी झोप मिळाली नाही तर त्यांची एकाग्रता आणि लक्ष कमी होते. त्यामुळे, नियमित वेळेवर झोपण्याची सवय लावणे आवश्यक आहे.

५. शिकवण्याची पद्धत मनोरंजक असावी. त्यात वैविध्य असावे खेळ असावेत. गोष्टी सांगा, फक्त माहिती देऊ नका. मुलांना अभ्यासात रस निर्माण होईल यासाठी अनेक पद्धती आहेत. त्यांचा अवलंब करा. 
 
६. पालकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. मुलांच्या अभ्यासात पालकांनी नियमितपणे लक्ष द्यावे, त्यांना प्रोत्साहन द्यावे आणि त्यांच्या अडचणी समजून घ्याव्या. यामुळे मुलांना आत्मविश्वास मिळतो आणि ते अभ्यासात अधिक रस घेऊ लागतात.

Web Title: tips for parents, Effective options to increase children's memory, study will be easy and enjoyable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.