Lokmat Sakhi >Parenting > चिंताजनक! बोलायला कुणी नाही म्हणून टीनएजर मुलं एआयशी बोलत सुटलेत, मुलांच्या एकाकीपणाची समस्या गंभीर

चिंताजनक! बोलायला कुणी नाही म्हणून टीनएजर मुलं एआयशी बोलत सुटलेत, मुलांच्या एकाकीपणाची समस्या गंभीर

Students Emotionally Depend On AI: एका सर्व्हेनुसार, शाळेतील 88 टक्के विद्यार्थी स्ट्रेसमधील असतील किंवा चिंतेत असतील तेव्हा आर्टिफिशियल इंटॅलिजन्सचा (AI) चा आधार घेतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 17:30 IST2025-08-21T17:06:36+5:302025-08-21T17:30:21+5:30

Students Emotionally Depend On AI: एका सर्व्हेनुसार, शाळेतील 88 टक्के विद्यार्थी स्ट्रेसमधील असतील किंवा चिंतेत असतील तेव्हा आर्टिफिशियल इंटॅलिजन्सचा (AI) चा आधार घेतात.

Survey finds 88 percent students take Artificial Intelligence emotional support during stress | चिंताजनक! बोलायला कुणी नाही म्हणून टीनएजर मुलं एआयशी बोलत सुटलेत, मुलांच्या एकाकीपणाची समस्या गंभीर

चिंताजनक! बोलायला कुणी नाही म्हणून टीनएजर मुलं एआयशी बोलत सुटलेत, मुलांच्या एकाकीपणाची समस्या गंभीर

Students Emotionally Depend On AI: एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटॅलिजन्सचा (AI) वापर गेल्या काही महिन्यात चांगलाच वाढला आाहेत. या सोयीमुळे आपली कामं सोपी होतात. मात्र, एका संशोधनातून पालकांची चिंता वाढणारी एक गोष्ट समोर आली आहे. एका सर्व्हेनुसार, शाळेतील 88 टक्के विद्यार्थी स्ट्रेसमधील असतील किंवा चिंतेत असतील तेव्हा आर्टिफिशियल इंटॅलिजन्सचा (AI) चा आधार घेतात. यात सगळ्यात जास्त प्रमाण 13-18 वयोगटातील आहे. जे भावनिकपणे एआयवर अवलंबून आहेत. 20 ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या एका सर्व्हेतून खुलासा करण्यात आला की, 57% टीनएजर्स एकटेपणा घालवण्यासाठी, स्ट्रेस घालवण्यासाठी आणि सल्ले घेण्यासाठी AI कडून इमोशनल सपोर्ट घेतात. 

Youth ki Awaaz आणि Youth Leaders For Active Citizenship यांनी मिळून 'Are You There, AI?' नावाने एक सर्व्हे केला. ज्यात जून 2025 मध्ये देशभरातील 506 टीनएजरनी सहभाग घेतला. या सर्व्हेचा उद्देश हे जाणून घेणं होता की, भारतात टीनएजर्स AI कडून इमोशनली कशी मदत मागतात. समोर जे आलं ते फारच धक्कादायक आहे. 

इमोशनल यूजसाठी ChatGPT

या सर्व्हेमधून समोर आलं की, ChatGPT इमोशनल सपोर्टसाठी सगळ्यात फेमस टूल आहे. यातून समोर आलं की, 52 टक्के महिला आपल्या खाजगी गोष्टी एआयसोबत शेअर करतात, ज्या मुलांच्या तुलनेत दुप्पट आहेत. लहान शहरांमधील 43 टक्के टीनएजर एआयसोबत खाजगी बाबी बोलतात. 

हे होण्याची कारणं...

सर्व्हेमधून खुलासा झाला की, 67 टक्के यूजर्स सोशल आयसोलेशनची चिंता करतात. तेच 58 टक्के यूजरना प्रायव्हसीसंबंधी धोक्यांची भिती आहे. एआयचा वापर केल्यावरही टीनएजरना आपल्या डेटाचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो, हे समजतं. पण तरीही 500 पेक्षा अधिक यूजर्ससाठी एआय मित्र, एकटेपणा घालवण्याचं माध्यम आणि मिडनाइट थेरपिस्ट आहे.

हा सर्व्हे पालकांसाठी खूप चिंता वाढवणारा आणि सतर्क राहण्याचा इशारा देणारा असा आहे. कारण जर पालकांनी वेळीच याकडे लक्ष दिलं नाही तर पाल्यांचं भविष्य धोक्यात येऊ शकतं. यासाठी त्यांच्याशी इमोशनली कनेक्ट होणं फार गरजेचं आहे. त्यासाठी संवाद महत्वाचा आहे.

Web Title: Survey finds 88 percent students take Artificial Intelligence emotional support during stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.