Join us

शाळेत जाणाऱ्या लेकरांची झुकू लागली मान आणि पाठीला बाक, एम्सचा रिपोर्ट-पाहा काय आहेत कारणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 14:56 IST

Children Health : अनेकदा पालक लहान मुलांची पोटदुखी, गॅस, बद्धकोष्ठता आणि अ‍ॅसिडिटी या समस्यांना पचनाशी संबंधित समस्या समजतात. पण असं नसतं.

Children Health : लहान मुलांच्या आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या आजकाल खूप जास्त बघायला मिळत आहेत. त्यात त्यांची मान दुखणं असो, पाठ दुखणं असो वा कंबर दुखणं असो. याची कारणं वेगवेगळी असतात. अनेकदा पालक लहान मुलांची पोटदुखी, गॅस, बद्धकोष्ठता आणि अ‍ॅसिडिटी या समस्यांना पचनाशी संबंधित समस्या समजतात. पण हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, काही केसेसमध्ये या समस्यांची कारणं पोटात नसून पाठीच्या मणक्यांमध्ये असतात.

मुळात मणक्यामधून निघणाऱ्या नसांवर जर दबाव पडला, डिस्क घसरली किंवा त्यांमध्ये ट्यूमर तयार झाला याचा थेट परिणाम पचन तंत्रावर पडतो आणि सोबतच मूत्रमार्गावरही पडतो. पण नेमकी कारणं माहीत नसल्यानं लोक नेहमीच गॅस–अपचन यावरच उपचार घेत राहतात. जे नुकसानकारक ठरू शकतं.

काय सांगते स्टडी?

एम्सच्या (AIIMS) एका ताज्या अभ्यासानुसार, 30 ते 50 वयोगटातील सुमारे 80% रुग्ण या कॅटेगरीत आहेत आणि स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये ही समस्या जास्त आहे. आता हा धोका मुलांपर्यंत पोहोचलाय. एम्सच्या रिपोर्टनुसार, शाळेत शिकणाऱ्या 47% मुलांना मान, कंबर, सांध्यांच्या वेदनांचा त्रास आहे.

काय आहेत कारणं?

लहान मुलांमध्ये मान, कंबर किंवा पाठीच्या या समस्या होण्यामागच्या कारणांमध्ये मुख्यपणे जास्तवेळ फोन पाहणं, लॅपटॉक वाकून बघणे, शाळेच्या पुस्तकांची जड बॅग आणि शारीरिक हालचाल कमी करणे या गोष्टींची समावेश आहे. एम्सच्या डॉक्टरांनी 380 मुलांची तपासणी केली, तेव्हा त्यांना 180 मुलांना गंभीर स्पाईन प्रॉब्लेम म्हणजे मणक्याची समस्या आढळून आली.

महत्वाची बाब

मणका आपल्या शरीराचा सगळ्यात महत्वाची भाग असतो. कारण त्यावरच आपलं शरीर टिकून राहतं. त्यामुळे मणक्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. आणखी एक बाब म्हणजे मणका हा केवळ पाठ सरळ ठेवण्यासाठी नसून तो शरीराची एक 'कंट्रोल रूम' आहे.

बचावाचे काही उपाय

पाठीच्या वेदना दूर करण्यासाठी अनहेल्दी लाइफस्टाईल बदलावी.

योग व व्यायामाने मोठा फायदा होतो.

खांदेदुखीसाठी हळदीचे गरम दूध व मध घ्या.

आलं आणि मध मिक्स करू चहा घ्या.

तिळाच्या तेलानं खांद्याची मालिश करा.

लसूण, हळद, तुळस, दालचिनी आणि आल्याचं नियमित सेवन करा.

इतरही काही उपाय

लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करू नका, टेबल/डेस्क वापरा.

काम करताना पाय जमिनीवर ठेवा.

कंबर सरळ ठेवा, खांदे झुकवू नका.

प्रत्येक 1 तासाने 5 मिनिटांचा ब्रेक घ्या.

ब्रेकमध्ये स्ट्रेचिंग, हलका व्यायाम करा.

English
हिंदी सारांश
Web Title : School kids' posture suffers: Heavy bags, phone use blamed.

Web Summary : AIIMS reports rising back problems in school children, linked to heavy bags, excessive phone use, and poor posture. Experts advise lifestyle changes, exercises, and ergonomic practices to prevent spinal issues.
टॅग्स :पालकत्वहेल्थ टिप्सआरोग्य