Lokmat Sakhi >Parenting > २ ते ५ वर्षांच्या मुलांना शिस्त लावण्याची सोपी ट्रिक; न ओरडता, न रागवता मुलं सभ्य, शांत होतील

२ ते ५ वर्षांच्या मुलांना शिस्त लावण्याची सोपी ट्रिक; न ओरडता, न रागवता मुलं सभ्य, शांत होतील

Parenting Tips : लहानपणीच मुलांना योग्य वळण लावणं गरजेचं असतं कारण तेव्हा मुलांची आकलनशक्ती जास्त असते आणि गोष्टी कायम लक्षात राहतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 04:07 PM2024-04-02T16:07:58+5:302024-04-02T16:09:41+5:30

Parenting Tips : लहानपणीच मुलांना योग्य वळण लावणं गरजेचं असतं कारण तेव्हा मुलांची आकलनशक्ती जास्त असते आणि गोष्टी कायम लक्षात राहतात.

Parenting Tips : How to discipline Your Child The Smart And Healthy Way | २ ते ५ वर्षांच्या मुलांना शिस्त लावण्याची सोपी ट्रिक; न ओरडता, न रागवता मुलं सभ्य, शांत होतील

२ ते ५ वर्षांच्या मुलांना शिस्त लावण्याची सोपी ट्रिक; न ओरडता, न रागवता मुलं सभ्य, शांत होतील

जगभरातील ट्रेंड्स, लाईफस्टाईल, लोकांच्या सवयी सर्व काही वेगाने बदलत आहे. अशा स्थितीत आपल्या मुलांना एक चांगली व्यक्ती कसं बनवावं, त्यांना शिस्त कशी लावावी असा प्रश्न अनेकांना पडतो. (Parenting Tips) मुलं जोपर्यंत चांगले वागत नाही तोपर्यंत आई वडीलांना त्याच्या भविष्याची चिंता कायम सतावत असते. (Effective Discipline For Children) लहानपणीच मुलांना योग्य वळण लावणं गरजेचं असतं कारण तेव्हा मुलांची आकलनशक्ती जास्त असते आणि गोष्टी कायम लक्षात राहतात. (How to discipline Your Child The Smart And Healthy Way) मानसिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. राहूल चंडोक यांनी  एका हिंदी वेबसाईटशी बोलताना मुलांना शिस्त लावण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत. (Steps To More Effective Parenting)

युनिसेफ फॉर एव्हरी चाईल्ड पॅरेंटींगच्या रिपोर्टनुसार मुलांना  रागवणे अथवा ओरडणे हा योग्य उपाय नाही. मुलांकडून असलेल्या अपेक्षा त्यांना व्यवस्थित समजावून सांगा. मुलांना चांगली वाईट वागणूक समजावून सांगा मुलं जितकं शांतपणे समजाववल्यानंतर ऐकतील तितकं ते तुम्ही ओरडून सांगितल्यानंतरही ऐकणार नाहीत. 

१) बोलण्यापेक्षा करून दाखवा

मुलं शब्दांपेक्षा क्रियांकडे जास्त लक्ष देतात. म्हणून त्यांना शिस्त लावण्याची पहिली पायरी आहे म्हणून आधी तुम्हाला शिस्त असायला हवी. मुलांना जर तुम्ही कितीही अपशब्द वापरले त्यांना कितीही शिकवलं तरी वाया जाईल म्हणून मुलाशी व्यवस्थितच बोलता.  मुलांशी चांगली वागणूक ठेवा. ज्यामुळे मुलं चांगली वागतील.

२) विचार करून बोला

मुलांच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देताना विचार करून द्या. कारण तुम्ही जे काही बोलता ते मुलं चांगलंच लक्षात ठेवतात. स्वत: तसं अनुकरण करतात. मुलांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांना ओरडून शांत करण्यापेक्षा त्यांच्या प्रश्नाची उत्तरं द्या.  त्यांना आपल्या गोष्टी ऐकण्यासाठी प्रेरीत करा. 

बाहेर नेलं की मुलं जास्तच हट्ट करतात? ४ गोष्टी करा; आपोआप शांत होतील-हट्ट करणार नाहीत

३) मुलांनी चूक केल्यास तिथेच चूक सुधारा

मुलांच्या वागण्याबोलण्यात आईवडीलांची महत्वाची भूमिका असते. मुलांनी चूक केल्यानंतर आई वडील किंवा नातेवाईक हसून ती गोष्ट टाळतात. मुलांच्या चुकांचा हिस्सा बनू नका.  वाईट शब्द उच्चारले किंवा चारचौघात मुलांचं वर्तन बिघडले तर त्यांना तिथे समजावून सांगतात रागवण्यात किंवा ओरड्यापेक्षा  हळू आवाजात समजावून सांगा.

तल्लख बुद्धीसाठी मुलांना खायला द्या ५ पदार्थ खा; स्मार्ट होतील मुलं- स्मरणशक्तीही वाढेल

४) इच्छा आणि हट्ट यातला फरक समजून घ्या

अनेकदा आई वडिल आपल्या मुलांची  इच्छा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात त्यांना हवं ते सगळं पुरवतात . मुलांची इच्छा आणि हट्ट यातला फरक समजून घ्या मुलांना समजावून सांगा की त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या  जाऊ शकत नाहीत यासाठी त्यांना प्रयत्न करणं गरजेचं असते. 

Web Title: Parenting Tips : How to discipline Your Child The Smart And Healthy Way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.