lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Parenting > बाहेर नेलं की मुलं जास्तच हट्ट करतात? ४ गोष्टी करा; आपोआप शांत होतील-हट्ट करणार नाहीत

बाहेर नेलं की मुलं जास्तच हट्ट करतात? ४ गोष्टी करा; आपोआप शांत होतील-हट्ट करणार नाहीत

How To Handle Child's Tantrums On Public Places : मुलं रडारड करत असतील किंवा ऐकत नसतील तर तुम्ही सोप्या टिप्स वापरून मुलांना आपलं म्हणणं पटवून देऊ शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 04:00 PM2024-03-26T16:00:48+5:302024-03-26T17:03:59+5:30

How To Handle Child's Tantrums On Public Places : मुलं रडारड करत असतील किंवा ऐकत नसतील तर तुम्ही सोप्या टिप्स वापरून मुलांना आपलं म्हणणं पटवून देऊ शकता.

How To Handle Child's Tantrums On Public Places : Top 4 Strategies For Dealing With Tantrums In Public | बाहेर नेलं की मुलं जास्तच हट्ट करतात? ४ गोष्टी करा; आपोआप शांत होतील-हट्ट करणार नाहीत

बाहेर नेलं की मुलं जास्तच हट्ट करतात? ४ गोष्टी करा; आपोआप शांत होतील-हट्ट करणार नाहीत

पालकांबरोबर मुलं जेव्हा बाहेर जातात तेव्हा आपल्याला हवी वस्तू मिळवण्यासाठी किंवा आपल्या मनाप्रमाणे  गोष्टी होण्यासाठी हट्ट करतात, रडारड करतात.  मुलांना हॅण्डल करणं आई-वडीलांसाठी कठीण होतं.  मुलांना  कसं शांत बसवायचं हेच आई- वडीलांना कळत नाही. (How To Handle Child's Tantrums On Public  Places)अशावेळी मुलांनी काही  गोष्टी समजावून सांगायला हव्यात जेणेकरून सार्वजनिक ठिकाणी मुलं रडारड करत असतील किंवा ऐकत नसतील तर तुम्ही सोप्या टिप्स वापरून मुलांना आपलं म्हणणं पटवून देऊ शकता. (Top 4 Strategies For Dealing With Tantrums In Public)

मुलांवर लक्ष द्या पब्लिकवर नाही

आई वडील विसरतात की त्यांना आपल्या मुलांवर जास्त लक्ष द्यायला हवं. पालक इतर लोकांचा विचार करून मुलांन कमी महत्व देतात आणि सर्वांसमोर मुलांवर ओरडतात जे पूर्णपणे चुकीचे आहे. मुलांना  व्यवस्थित समजावून सांगा. बाहेर जाण्याच्या आधीच मुलांकडे लक्ष द्या.

खूप मेहनत करूनही वजन कमी नाहीये? या आजारामुळे वजन घटवणं होतं कठीण-४ वेट लॉस टिप्स

मुलांना कर्म्फर्टेबल फिल करून द्या

मुलं जेव्हा रडू लागतात तेव्हा त्यांना प्रेमाने समजावून सांगा. त्यांना मिठी मारून शांत बसवा. मुलांना तुम्ही जे हवं ते घेऊ द्या किंवा त्यांना शांत बसवण्याचा प्रयत्न करा. मुलं अजून रडतील असे काहीही करू नका. किंवा त्या ठिकाणाहून दुसरीकडे कुठे मुलांना न्या. 

थोडं काम केलं तरी कंबर-पाठ दुखते? 'या' पद्धतीने खजूर खा; बळकट हाडं-१४ आजार होतील दूर

मुलांवर ओरडू नका

सार्वजनिक स्थळांवर मुलं किंवा लहान मुलं रडत असतील तर आई वडीलांनी त्यांना ओरडण्याऐवजी शांतपणे समजावून सांगावे.  मुलांशी प्रेमाने संवाद साधल्यास ते थोड्याचवेळात शांत बसतील. मुलं घरात शांत आणि बाहेर गेल्यानंतर त्रास देत असतील तर त्यांना सांगा ते त्यांचे वागणे पूर्णपणे चुकीचे आहे. मुलांना 

बाहेर घेऊन जा

मुलं खूप जास्त जिद्द करत असतील आणि तुमचं अजिबात ऐकत नसतील तर  त्यांना समजावण्याचा प्रयत्न करा.  सार्वजनिक ठिकाणी मुलांना घेऊन जा. मुलं घरात तुमची एखादी गोष्ट ऐकत नसतील तर बाहेर गेल्यानंतर तरी ऐकतील.  कोणतंच काम मुलांकडून जबरदस्तीने करून घेऊ नका. त्यांना प्रेमाने समजावून सांगा.

Web Title: How To Handle Child's Tantrums On Public Places : Top 4 Strategies For Dealing With Tantrums In Public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.