lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Parenting > मेंदूचा विकास होण्यासाठी मुलांकडे ही ४ खेळणी असायलाच पाहिजेत, वाचा बालरोगतज्ज्ञांचा सल्ला

मेंदूचा विकास होण्यासाठी मुलांकडे ही ४ खेळणी असायलाच पाहिजेत, वाचा बालरोगतज्ज्ञांचा सल्ला

Toys That Helps To Improve Brain Development In Child: मोबाईल, टीव्ही असं काही मुलांना दाखविण्यापेक्षा ही खेळणी त्यांना आणून द्या... १ ते ३ वर्षाच्या मुलांच्या मेंदूचा विकास होण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2023 02:27 PM2023-10-13T14:27:46+5:302023-10-13T14:28:52+5:30

Toys That Helps To Improve Brain Development In Child: मोबाईल, टीव्ही असं काही मुलांना दाखविण्यापेक्षा ही खेळणी त्यांना आणून द्या... १ ते ३ वर्षाच्या मुलांच्या मेंदूचा विकास होण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होईल.

Parenting Tips: 4 simple must have toys to help your child’s skill and brain development | मेंदूचा विकास होण्यासाठी मुलांकडे ही ४ खेळणी असायलाच पाहिजेत, वाचा बालरोगतज्ज्ञांचा सल्ला

मेंदूचा विकास होण्यासाठी मुलांकडे ही ४ खेळणी असायलाच पाहिजेत, वाचा बालरोगतज्ज्ञांचा सल्ला

Highlightsमुलांसोबत काही वेळ खेळून त्यांना या खेळाची गोडी लावा. कारण या खेळणीतून मुलांची क्रियेटीव्हीटी वाढण्यास मदत होते.

१ ते ३ वर्षांच्या मुलांना (ideal toys for 1 to 3 years kids) कसं खेळवायचं, असा प्रश्न त्यांच्या आई- वडिलांना नेहमीच पडतो. त्यातही आईकडे ही जबाबदारी जरा जास्तच असते. या वयात मुलांची कोणतीही गोष्टी आकलन करण्याची क्षमता खूप जास्त असते. त्यामुळे या वयात जर त्यांना योग्य खेळणी आणून दिली आणि ती कशी खेळायची हे त्यांना शिकवलं, तर ती मुलांना बौद्धिक विकास करण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतात. हल्लीच्या मुलांना बार्बी, सॉफ्ट टॉय आवडतात. आवडत असतील तर ते त्यांना द्या. पण बौद्धिक विकास करणारी ही काही खेळणीही देऊन पाहा (Toys That Helps To Improve Brain Development In Child). यामुळे मुलांची एकाग्रता वाढण्यासाठीही मदत होते. (toys to improve concentration)

 

मुलांचा बौद्धिक विकास करणारी खेळणी
parentingwithbrainify या पेजवर याविषयीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 
१. स्टॅकिंग रिंग्स

यामध्ये वेगवेगळ्या आकाराच्या ५ किंवा ७ रिंग असतात. मोठ्यापासून छोट्यापर्यंत किंवा मग छोट्यापासून मोठ्यापर्यंत अशा क्रमाने त्या मुलांना रचायच्या असतात. यातून मुलांना आकारमानाची संकल्पना लक्षात येते.

 

२. वुडन शेप

यामध्ये त्रिकोण, चौकोन, गोल, षटकोन असे वेगवेगळे भौमितीक आकार असतात.

गरबा खेळताना ओढणी सारखी मधेमधे येते? बघा दुपट्टा कॅरी करण्याच्या ३ हटके स्टाईल, बिंधास्त खेळा गरबा

त्यासोबतच एक लाकडी पॅडही असतो. मुलांना हे सगळे आकार त्या लाकडी पॅडवरच्या साच्यामध्ये अचूकप्रकारे ठेवायचे असतात. आकाराऐवजी अल्फाबेट्स किंवा क्रमांक असेही असतात. ते घेतले तरी चालतात. 

 

३. पुढे ढकलण्याच्या खेळणी

मुलांच्या काही खेळणी असतात ज्यांना जोर लावून त्या पुढे ढकलायच्या असतात.

साबुदाण्याची खिचडी करताना ५ चुका टाळा, मोत्यासारखा टपोरा- मोकळा दिसेल साबुदाणा- खिचडी होईल मऊसूत

त्या खेळल्यामुळे कोणत्या वस्तूवर किती जोर दिला तर ती किती लांब जाऊ शकते, याचे आकलन मुलांना होते. मुलांच्या motor skill विकसित करण्यासाठी हे खेळणे उपयुक्त आहे.

 

४. बिल्डिंग ब्लॉक्स

या प्रकारातली खेळणी काही मुलं खूपच उत्साहात खेळतात तर काही मुलं ती खेळण्याचा कंटाळा करतात. पण मुलांसोबत काही वेळ खेळून त्यांना या खेळाची गोडी लावा. कारण या खेळणीतून मुलांची क्रियेटीव्हीटी वाढण्यास मदत होते.

 

Web Title: Parenting Tips: 4 simple must have toys to help your child’s skill and brain development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.