साबुदाण्याची खिचडी करताना ५ चुका टाळा, मोत्यासारखा टपोरा- मोकळा दिसेल साबुदाणा- खिचडी होईल मऊसूत

Published:October 13, 2023 12:43 PM2023-10-13T12:43:29+5:302023-10-13T13:01:01+5:30

साबुदाण्याची खिचडी करताना ५ चुका टाळा, मोत्यासारखा टपोरा- मोकळा दिसेल साबुदाणा- खिचडी होईल मऊसूत

साबुदाण्याची खिचडी कधी खूपच गचका होते तर कधी अगदीच कोरडीफटक होते. कधी साबूदाणा कच्चा राहतो तर कधी गरजेपेक्षा जास्तच भिजतो. तुमचंही असंच होत असेल तर साबुदाण्याची खिचडी करताना आपलं नेमकं काय चुकतंय ते एकदा पाहून घ्या...

साबुदाण्याची खिचडी करताना ५ चुका टाळा, मोत्यासारखा टपोरा- मोकळा दिसेल साबुदाणा- खिचडी होईल मऊसूत

लवकरच नवरात्रीचे उपवास सुरू होत आहेत. त्यामुळे त्याच्याआधीच परफेक्ट चवीची साबुदाणा खिचडी कशी करायची ते आता झटपट पाहून घेऊ या.. या काही टिप्स मधुराज रेसिपी या युट्यूब चॅनलवर शेअर केल्या आहेत. या काही टिप्स लक्षात ठेवून खिचडी केली तर ती नक्कीच मऊसूत तर होईलच शिवाय खिचडीतला प्रत्येक साबुदाणा अगदी मोत्यासारखा टपोरा आणि मोकळा होईल.

साबुदाण्याची खिचडी करताना ५ चुका टाळा, मोत्यासारखा टपोरा- मोकळा दिसेल साबुदाणा- खिचडी होईल मऊसूत

यातली पहिली टिप म्हणजे साबुदाणा खिचडी करण्याआधी साबुदाणा हलक्या हाताने चोळून ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून घ्या. कारण साबुदाण्यामध्ये स्टार्च जास्त प्रमाणात असते. धुतल्यामुळे स्टार्च निघून जाते. जर आपण साबुदाणा व्यवस्थित धुतला नाही तर स्टार्च तसाच राहतो आणि खिचडीला चिकटपणा येतो.

साबुदाण्याची खिचडी करताना ५ चुका टाळा, मोत्यासारखा टपोरा- मोकळा दिसेल साबुदाणा- खिचडी होईल मऊसूत

दुसरी चूक म्हणजे साबुदाणा कमी वेळ भिजवणे. काही जणी साबुदाणा भिजत टाकायला विसरतात आणि मग कमी वेळच तो भिजतो. त्यामुळे विसरत असाल तर आलार्म लावून लक्षात ठेवा. पण साबुदाणा ८ ते १२ तास भिजू द्या.

साबुदाण्याची खिचडी करताना ५ चुका टाळा, मोत्यासारखा टपोरा- मोकळा दिसेल साबुदाणा- खिचडी होईल मऊसूत

तिसरी गोष्ट अशी की साबुदाणा भिजवताना पाणी किती घालायचं याचं प्रमाण बऱ्याचदा चुकतं. त्यामुळे जेवढा साबुदाणा असेल त्याच्या वर अगदी १ ते दिड सेमी पाणी राहील, एवढंच पाणी घाला.

साबुदाण्याची खिचडी करताना ५ चुका टाळा, मोत्यासारखा टपोरा- मोकळा दिसेल साबुदाणा- खिचडी होईल मऊसूत

चौथी टिप अशी की खिचडीत घालण्यासाठी आपण जो शेंगदाण्याचा कूट करतो तो जाडाभरडा असावा. खूप बारीक भुकटीसारखा कूट करू नये...

साबुदाण्याची खिचडी करताना ५ चुका टाळा, मोत्यासारखा टपोरा- मोकळा दिसेल साबुदाणा- खिचडी होईल मऊसूत

पाचवी गोष्ट म्हणजे खिचडी नेहमी तुपातच करा. आणि फाेडणी करून साबुदाणा तुपात व्यवस्थित परतून झाल्यानंतरच मग शेंगदाण्याचा कूट टाका. साबुदाणा व्यवस्थित परतून घेतला नाही तर खिचडी गचका होते शिवाय साबुदाण्याला तुपाचा छान स्वाद येत नाही.