Child Health : आज वेगाने बदलत असलेल्या या जगाचा आपल्या मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर प्रभाव पडतो. पण कधी विचार केलाय का की, त्यांच्यावर याचा कसा प्रभाव पडतो? सध्याचं जग हे फारच नाजूक वळणावर आहे. अलिकडेच लान्सेट कमीशन ऑन एडोलसेंट हेल्थच्या रिपोर्टमधून याबाबत एक गंभीर इशारा देण्यात आलाय. या रिपोर्टनुसार २०३० पर्यंत जगभरात एक अब्जापेक्षा अधिक टीनएजर्स अशा स्थितीत जगतील, ज्यात डिप्रेशन, लठ्ठपणा आणि गंभीर इजा त्यांच्या जीवनात एक मोठा धोका बनेल. या दिलासादायक एक बाब म्हणजे या समस्या रोखता येऊ शकतात, जर आपण आताच लक्ष दिलं.
मानसिक समस्यांचं मोठं संकट
आजकाल टीनएजर्समध्ये डिप्रेशन आणि एंझायटीसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहेत. रिपोर्ट सांगतो की, २०३० पर्यंत तरूणांच्या जीवनात वेगवेगळ्या मानसिक समस्या बघायला मिळतील.
काय आहे कारण?
इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वाढता दबाव
पर्यावरण आणि भविष्याबाबत चिंता
शिक्षण आणि करिअरमध्ये वाढती स्पर्धा
लठ्ठपणाची समस्या
जंक फूड खाण्याचं वाढतं प्रमाण आणि एकाच जागी बसून वेळ घालणारी लाइफस्टाईल फार घातक ठरत आहे. रिपोर्टचा अंदाज आहे की, २०३० पर्यंत ४६ कोटीपेक्षा अधिक तरूण लठ्ठपणाचे शिकार होऊ शकतात. पुढे जाऊन त्याना डायबिटीस आणि हृदयरोगांचा सामना करावा लागू शकतो.
दुर्घटना, हिंसा आणि डिजिटल धोके
शारीरिक आणि मानसिक आजारांसोबतच, सुरक्षेत चूकही या वयाच्या मुलांमध्ये जीवघेणी ठरत आहे. १० ते २४ वयोगटात आजही मृत्यूच्या मुख्य कारणांमध्ये सुरक्षेत चूक झाल्याच्या दुर्घटनांचा समावेश आहे.
आजच्या डिजिटल युगात सायबर बुलिंग हा मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी एक मोठा धोका बनत आहे. या विषयावर तयार केलेल्या महत्त्वाच्या अहवालात युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन, युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न आणि इतर जागतिक शैक्षणिक संस्थांच्या तज्ज्ञांचा सहभाग आहे. हा अहवाल द लांसेट जर्नल अंतर्गत प्रकाशित करण्यात आला आहे.
हा अहवाल आपल्यासाठी एक स्पष्ट इशारा आहे. आता वेळ आली आहे की आपण आपल्या मुलांच्या जीवनशैलीकडे, त्यांच्या मानसिक आरोग्याकडे आणि सुरक्षिततेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. योग्य वेळी उपाययोजना केल्यास 2030 पर्यंत निर्माण होणाऱ्या या मोठ्या संकटाला टाळता येऊ शकते.
