Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाळा नको म्हणणाऱ्या लेकराला आईने टांगाटोळी करत नेलं वर्गात, व्हायरल व्हिडिओ- शाळेची भीतीनं लेकरु रडलं पण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2026 18:32 IST

Mother Carries Crying Child to Classroom, Heart-Touching School Moment Goes Viral : मुलाला जबरदस्ती शाळेत सोडतानाचा आईचा व्हिडिओ व्हायरल.

"नको ना ग आई आज शाळेत नाही जायचं." वाक्य जरा ओळखीचं वाटतं ना? लहानपणी सगळ्यांनीच आईकडे आज घरीच थांबतो म्हणून हट्ट केलेला असतो. कोणाला खरंच परवानगी मिळाली तर कोणाला मिळाले फटके. शाळेत जाण्याची भीती, आळस, कंटाळा हा तसं लहानपणी आपण सगळ्यांनीच अनुभवला आहे. (Mother Carries Crying Child to Classroom, Heart-Touching School Moment Goes Viral)हाताला धरुन जबरदस्ती आईने शाळेत सोडलं असं एकदातरी होतच किंवा बाबा गाडीवर बसवून थेट सरांसमोर नेऊन उभं करायचे. त्यावेळी राग आणि रडायला येतं नंतर आठवून मजा वाटते. असाच एक किस्सा लहानशा खेडे गावात घडला त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. मुलगा शाळेत जायला नाही म्हणाला त्यावर त्याच्या आईची जी काही अॅक्शन होती ती फारच वेगळी. 

बाजूबाजूच्या चार पोरांना गोळावरुन सगळ्यांनी मिळून त्या मुलाला उचललं आणि थेट शाळेत नेऊन सोडलं. त्याचा लहान भाऊ मागून त्याच्या चपला घेऊन धावत येत होता. आईने दप्तर पाठीला लावले आणि पोराला शाळेत दाखल केलं. हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याचे मिमही व्हायरल झाले. लहानपण आठवून सगळ्यांनाच हसू आले आणि असा प्रश्नही पडला की शाळेत जाण्याची एवढी भीती मुलांमध्ये का असते?

भीती असतेच असे नाही बरेचदा कंटाळाही असतोच. मात्र भीती असेल तर त्यामागील कारणे जाणून घेणं पालकांचं कर्तव्य आहे. मुल जर काही सांगू पाहत असेल तर ते शांतपणे ऐकणं गरजेचं आहे. शाळेत शिक्षकांचे वर्तन कदाचित चुकत असेल किंवा एखादा मित्र त्रास देत असेल. अभ्यासाची भीती असेल किंवा शिक्षेची भीती असू शकते. शाळेत जाण्याची भीती वाटण्याची अनेक कारणे असू शकतात. ती भीती घालवणे पालकांचे काम आहे. शाळेचे दिवस सोन्यासारखे असतात ते रडत खुडत घालवण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे मुलांना शाळेत का नाही जायचं असा प्रश्न प्रेमाने आणि आत्मीयतेने विचारुन पाहा. त्यांचे उत्तर समजूतदारपणे ऐकून घ्या. 

पण जर फक्त आळस असेल कंटाळा आल्यामुळे शाळेत जायला मुलं नाही म्हणत असतील तर मग असे मार्ग भारतील पालक नेहमी निवडतातच. शाळेला दांडी मारण्याची सवय मुलांना लागली की अभ्यासाची गोडी निर्माणच होणार नाही. शिक्षण फक्त करायचे म्हणून केले तर त्यात काही मजा नाही. मुलांमध्ये शाळेची ओढ तयार होईल असे कार्यक्रम आणि वातावरण असणे गरजेचे आहे.      

English
हिंदी सारांश
Web Title : Mom carries crying child to school; viral video sparks debate.

Web Summary : A viral video shows a mother carrying her reluctant child to school, sparking amusement and reflection on children's school aversion. The article explores reasons behind this reluctance, advising parents to understand their child's fears and address them with empathy, distinguishing between genuine fear and mere laziness.
टॅग्स :पालकत्वशाळासोशल व्हायरलसोशल मीडियाविद्यार्थी