lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Parenting > यशस्वी-हूशार मुले घडवण्याची जपानी पालकांची सोपी युक्ती; जपानी मुलांसारखी शिस्तीने वागतील मुलं

यशस्वी-हूशार मुले घडवण्याची जपानी पालकांची सोपी युक्ती; जपानी मुलांसारखी शिस्तीने वागतील मुलं

Japanese Parenting Tricks : जपानी पालक मुलांना हेल्दी पदार्थही इंटरेस्टिंग बनवून देतात. ज्यामुळे मुलं जास्तीत जास्त पौष्टीक पदार्थ खातात.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 10:32 AM2024-01-18T10:32:57+5:302024-01-18T10:49:59+5:30

Japanese Parenting Tricks : जपानी पालक मुलांना हेल्दी पदार्थही इंटरेस्टिंग बनवून देतात. ज्यामुळे मुलं जास्तीत जास्त पौष्टीक पदार्थ खातात.

Japanese Parenting Tricks : 4 Things You Should Learn From Japanese Parents | यशस्वी-हूशार मुले घडवण्याची जपानी पालकांची सोपी युक्ती; जपानी मुलांसारखी शिस्तीने वागतील मुलं

यशस्वी-हूशार मुले घडवण्याची जपानी पालकांची सोपी युक्ती; जपानी मुलांसारखी शिस्तीने वागतील मुलं

मुलांचे पालनपोषण करणं काही सोपं काम नाही. (Parenting Tips in Marathi) आयुष्याची प्रत्येक लढाई मुलांनी जिंकावं यासाठी लहानपणी त्यांच्यावर झालेले संस्कार, त्यांचे पालनपोषण फार महत्वाचे असते. (4 Things You Should Learn From Japanese Parents) व्यक्तीच्या सवयी, बोलण्या चालण्याच्या सवयींवरून त्याच्या संस्कारांची ओळख पटते. इंटरनेटवर जपानचे लोक एक पाऊल पुढे असल्याचं  दिसून येतं. (Japanese Parenting Tricks) जपानी लोकांचा वागणे-बोलणे आणि त्यांच्या पालनपोषणाच्या पद्धती काही प्रमाणात वेगळ्या आहेत. जपानी पालकांच्या काही ट्रिक्स वापरून तुम्ही मुलांवर चांगले संस्कार करू शकता. जेणेकरून भविष्यातही मुलं चांगले राहतील. (Japanese Parenting Secrets For Raising Respectful) 

1) मुलांना आत्मनिर्भर बनवा

 द एशियन  पॅरेंटच्या रिपोर्टनुसार  जपानी मुलं लहानपणापासूनच आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करतात. आपलं साहित्य स्वत:खरेदी करणं, आपल्या आवडीच्या गोष्टींची निवड करणं, कोणाचीही मदत न घेतात आत्मविश्वासाने काम करणं या गोष्टी त्यांना लहानपणापासून आत्मनिर्भर बनवतात.  ज्यामुळे मुलं वाढत्या वयात पालकांवर लहान-सहान गोष्टींसाठी पालकांवर अवलंबून राहत नाही.

2) खाण्याला इंटरेस्टींग बनवा

मुलं खाण्यापिण्याच्या बाबतीत खूपच नाक मुरडतात. कोणताही हेल्दी पदार्थ मुलांना खायला आवडत नाही.  तर काहीजणांना जंक फूड  खाणं खूपच आवडतं. जपानी पालक मुलांना हेल्दी पदार्थही इंटरेस्टिंग बनवून देतात. ज्यामुळे मुलं जास्तीत जास्त पौष्टीक पदार्थ खातात. तुम्ही सुद्धा पौष्टीक पदार्थ वेगळ्या पद्धतीने आपल्या मुलांना खायला देऊ शकता. 

कितीही डोळे वटारा मुलं ऐकतच नाहीत? सद्गुरु सांगतात ५ गोष्टी, मुलं समजुतदार-गुणी होतील

3) शिस्त

मोटिव्हेशन थोड्यावेळासाठी मुलांमध्ये असते पण मुलांमध्ये शिस्त असेल जर जे कोणतंही काम नियमित आणि वेळेवर करतील. जपानी आई-वडील आपल्या मुलांच्या शिस्तीवर विशेष लक्ष देतात. लहानपणापासूनच मुलांना शिस्त लागली तर आयुष्यात  मोठ्या प्रसंगाशी मुलं लढू शकतात.

वाचलेलं काहीच लक्षात राहत नाही? ४ गोष्टी करा; स्मरणशक्ती वाढेल, पाठ केलेलं विसरणार नाहीत मुलं

4) इमोशनल ग्रोथ

मुलांच्या भाव-भावनांना स्वीकारणं गरजेचं असतं. मुलं कोणतंही कोणतंही काम करायला नको म्हणतात, हट्ट पूर्ण केला नाही की रडतात आणि पालक त्यांना शांत बसवण्याच्या प्रयत्नात असतात. जपानी लोक मुलांचे पालन पोषण करतान मुलांच्या इमोशन्सवर लक्ष देत आणि त्यांना समजावतात.  ज्यामुळे मुलं आपल्या भावना  पालकांशी शेअर करतात. ज्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहते.

Web Title: Japanese Parenting Tricks : 4 Things You Should Learn From Japanese Parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.