lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Parenting > कितीही डोळे वटारा मुलं ऐकतच नाहीत? सद्गुरु सांगतात ५ गोष्टी, मुलं समजुतदार-गुणी होतील

कितीही डोळे वटारा मुलं ऐकतच नाहीत? सद्गुरु सांगतात ५ गोष्टी, मुलं समजुतदार-गुणी होतील

5 Essential Parenting Skills : आईवडील दोघेही कामासाठी बाहेर जात असल्यामुळे आपल्या मुलांना जास्तवेळ देऊ शकत नाहीत. काही पालक तर २ ते ३ दिवस घरात राहूनही मुलांशी मनमोकळेपणाने बोलत नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 02:45 PM2024-01-15T14:45:14+5:302024-01-15T15:08:27+5:30

5 Essential Parenting Skills : आईवडील दोघेही कामासाठी बाहेर जात असल्यामुळे आपल्या मुलांना जास्तवेळ देऊ शकत नाहीत. काही पालक तर २ ते ३ दिवस घरात राहूनही मुलांशी मनमोकळेपणाने बोलत नाहीत.

5 Essential Parenting Skills : 5 Best Parenting Tips Given By Sadguru To Give Wisdom And Values | कितीही डोळे वटारा मुलं ऐकतच नाहीत? सद्गुरु सांगतात ५ गोष्टी, मुलं समजुतदार-गुणी होतील

कितीही डोळे वटारा मुलं ऐकतच नाहीत? सद्गुरु सांगतात ५ गोष्टी, मुलं समजुतदार-गुणी होतील

मागच्या काही वर्षात पालकत्वाच्या संकल्पना आणि पद्धती बऱ्याच बदलल्या आहेत. आधी पुरूष पैसे कमावण्यासाठी घराबाहेर पडत असत आणि महिला घर सांभाळत असतं. (Tips For Parenting a Teenager) याऊलट आज दोघंही चांगले पैसे कमावतात आणि मुलांना सांभाळण्याची जबाबदारीही दोघांची असते. पण घरातलं काम, ऑफिसच्या जबाबदाऱ्या आणि मुलांचा सांभाळ करणं, त्यांना चांगले संस्कार देणं हे एका वेळी करणं महिलांसाठी कठीण होतं. याचा परिणाम मुलांवरही झालेला दिसून येतो. (5 Good Parenting Tips To Help Children Blossom)

आईवडील दोघेही कामासाठी बाहेर जात  असल्यामुळे आपल्या मुलांना जास्तवेळ देऊ शकत नाहीत. काही पालक तर २ ते ३ दिवस घरात राहूनही मुलांशी मनमोकळेपणाने बोलत नाहीत. (Best Parenting Tips) अशा वर्तनामुळे मुलं चिडचिड करतात. पालक आणि मुलं दोघंही खूश राहू शकत नाहीत. सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी काही सोप्या टिप्स  पालकांसाठी शेअर केल्या आहेत.  ज्याचा रोजच्या  जीवनात अवलंब केल्यास मुलांवर चांगले संस्कार होतील. (5 Best Parenting Tips Givem By Sadguru To Give Wisdom And Values)

१) मुलांना जास्तीत जास्त वेळ द्या

मुलांच्या चांगल्या पालन पोषणासाठी वेळ देणं सगळ्यात जास्त गरजेचं असतं.  तुम्ही मुलांना जितका जास्तवेळ द्याल तितकंच चांगले बॉन्डींग राहील. आई-वडील दोन्ही वर्कींग असतील तर तुम्ही आपल्या वेळेनुसार मुलांसाठी वेळ काढा. आई किंवा वडील दोघांपैकी एकजण तरी मुलांबरोबर असायला हवं. 

२) घरातलं वातावरण

मुलांच्या संगोपनात कुटुंबातील आणि  घरातील वातावरणही महत्वाचे असते. घरात चांगले वातावरण  असेल तर मुलांवर त्याचा चांगला परिणाम होईल. असं वातावरण मुलांनी खूश आणि निर्भय बनवते. 

वाचलेलं काहीच लक्षात राहत नाही? ४ गोष्टी करा; स्मरणशक्ती वाढेल, पाठ केलेलं विसरणार नाहीत मुलं

३) भांडण करू नका

मुलांची पहिली शिक्षक ही त्यांची आई असते. मुलांचे खरे शिक्षण घरातून सुरू होते. म्हणूनच पालकांनी मुलांसमोर कधीच भांडणं करू नयेत. आई-वडीलांसारखेच अनुकरण मुलं करतात. तुम्ही जितके समजदार असाल तितकी मुलांची पर्सनॅलिटी चांगली होईल. 

प्रोटीन-व्हिटामीनचा खजिना आहेत १ चमचा तीळ; १० आजार दूर राहतील

4) मुलांना सपोर्ट करा

मुलांना चुका केल्यानंतर ओरडणं गरजेचं आहे पण  कामांमध्ये सपोर्ट करा. मुलांच्या योग्य निर्णयाचे सपोर्ट करा. तुमचा बॉन्ड मजबूत होईल आणि मुलं तुम्हाला मित्रांप्रमाणे सर्वकाही शेअर करतील. 

5) कुटुंब

लहान मुलांच्या संगोपनात कुटुंबाचे सगळ्यात मोठे योगदान असते. जर तुम्ही आपल्या कामासाठी आई-वडीलांपासून लांब राहत असाल तरी वेळ काढा. असं केल्याने मुलांना कुटूंबाची किंमत कळेल आणि भविष्यात स्वत:ही व्यवस्थित वागतील.

Web Title: 5 Essential Parenting Skills : 5 Best Parenting Tips Given By Sadguru To Give Wisdom And Values

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.