घरात नवीन बाळ जन्माला आल्यानंतर घरातल्या व्यक्तींकडून, बाहेरच्यांकडून बरेच सल्ले मिळत असतात. अशावेळी नवीन मातांना काय करावं, काय नाही ते कळत नाही. बाळ रडत असेल किंवा दूध पित नसेल तर घुटी द्या असं सांगितलं जातं. (Is Jaman Ghutti Safe For Babies) घुटी देणं चांगलं की अयोग्य याचे फायदे तोटे काय याबाबत बालरोगतज्ज्ञ व नवजातशिशूतज्ज्ञ डॉ. किरण फडतरे घार्गे यांनी अधिक माहिती दिली आहे. (Is It ok to give guti to infants know doctors advice)
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार नवजात बाळाला आईच्या दुधाव्यतिरिक्त काहीही देऊ नये. डॉक्टरही घुट्टी देण्यास मनाई करतात. बाजारात मिळणाऱ्या घुट्टीत प्रिजर्व्हेटिव्हज असतात जे नवजात मुलांसाठी धोकादायक ठरू शकतात (Ref). एक वर्षांपेक्षा लहान असलेल्या मुलांना कच्च मध देऊ नये. यामुळे बोटुलिस्म हा दुर्मिळ आजार होऊ शकतो. हा आजार १ वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांमध्ये होऊ शकतो.
घुटी म्हणजे काय?
प्रत्येक प्रदेशानुसार आणि भागानुसार घुटीमध्ये वापरले जाणारे पदार्थ बदलतात. सामान्यत: त्यात बदाम, खारीक, जायफळ, मुरूड शेंग, आंबे हळद या पदार्थांचा वापर केला जातो. आयुर्वेदानुसार हे घटक रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारे समजले जातात. पचनसंस्था सुधारण्यासाठी याचे सेवन केले जाते पण आपल्या नवजात बाळांचे शरीर किंवा त्यांची पचनसंस्था असे जड पदार्थ पचवण्यास पूर्णपणे सक्षम नसते. डेव्हलपिंग स्टेटमध्ये असते. त्यामुळे त्यामुळे या आयुर्वेदीक गोष्टींचा फायदा या लहानशा शरीराला होत नाही.
घुटी बनवण्याची पद्धत
घुटी बनवण्याची पद्धत काहीशी अस्वच्छ असते. बदाम किंवा खारीक ओले करून आपण उगळवून देतो. दुसऱ्या दिवशी तोच बदाम किंवा खारीक मुलांना दिली जाते. ज्यातून बुरशी आणि रोगजंतू शरीरात प्रवेश करू शकतात.
त्यामुळे बाळाला पातळ शी होणं, शी मधून रक्त येणं, डिहायड्रेशन असे विकार उद्भवतात. सोप्या शब्दात आईचं दूधच मुलांसाठी चांगले असते. त्यात प्रोबायोटीक्स, फॅट्स, प्रोटीन्स इतर पोषक तत्व असतात. पहिले सहा महिने बाळाला आईच्या दुधाशिवाय दुसरं काहीही देऊ नये.