काही मुलं अशी असतात जी एकाजागी शांतपणे बसून अजिबात अभ्यास करत नाहीत. सतत त्यांची चुळबूळ चाललेली असते. अभ्यास करायला बसलं की पुस्तकाशिवाय आजुबाजुच्या इतर गोष्टीच त्यांना जास्त आकर्षित करतात आणि मग अभ्यास होतच नाही. म्हणूनच मुलांची एकाग्रता वाढण्यासाठी काही गोष्टी करून पाहा. काही गोष्टींची त्यांना सवय लावा जेणेकरून मनाची चंचलता कमी होऊन मन शांत होईल आणि एकाग्रता वाढेल.
मुलांची एकाग्रता वाढण्यासाठी उपाय
अभ्यासाचं रुटीन बनवा. दिवसातले काही तास हे फक्त अभ्यासासाठीच असणार आहेत हे ठरवून घ्या. यामुळे आता अभ्यास करायचा आहे, अशी मनाची तयारी आधीच होऊन जाते.
सलग काही तास अभ्यासाला बसलं तर कंटाळा येतो. त्यामुळे दर ४५ मिनिटांनी किंवा एखाद्या तासाने ५ मिनिटांचा ब्रेक घ्या आणि फ्रेश व्हा. त्या वेळेत पाणी प्या, फळं खा.
किचनमधले ४ पदार्थ एकत्र करून खा! हाडांसाठी मस्त टॉनिक, म्हातारे झालात तरीही हाडं राहतील ठणठणीत
अभ्यास करताना मोबाईलपासून दूर ठेवा. शक्यतो अभ्यासाच्या ठिकाणी मोबाईल घेऊन बसूच नका. कारण त्यामुळे अभ्यासात खूप व्यत्यय येतो. बराच वेळ मोबाईलवरचे नोटीफिकेशन्स पाहण्यात जातो.
अभ्यास करण्यासाठी घरातली अशी जागा निवडा जी शांत आहे. जिथे कोणाचे फारसे आवाज येत नाहीत. शिवाय ती जागा भरपूर उजेड असणारी आणि स्वच्छ असावी. अशी जागा घरात नसेल तर लायब्ररी लावून अभ्यास करणे चांगले.
वाचन करताना हातात पेन्सिल घेऊन बसा. महत्त्वाचे मुद्दे लगेच मार्क करा किंवा लिहून काढा. कारण सतत नुसतं वाचन करणं अनेकांना जमत नाही.
दररोज सकाळी थोडावेळ ध्यानधारणा आणि व्यायाम नक्की करा. या २ गोष्टींमुळे एकाग्रता वाढण्यास नक्कीच मदत होते.
त्याच त्या भाज्या खाण्याचा कंटाळा आला? मराठवाडी पद्धतीने करा कुरडईची खमंग भाजी, घ्या रेसिपी
रात्रीची झोप ही ७ ते ८ तासांची झालीच पाहिजे. झोप शांत झाली तरच तुम्ही फ्रेश मूडमध्ये अभ्यासाला बसू शकाल. आळस येणार नाही.
सकाळी, रात्री, दुपारी असा दिवसातल्या काेणत्या वेळी चांगला अभ्यास होतो हे लक्षात घ्या आणि त्या वेळेत जास्तीतजास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करा.
