lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Parenting > मुलं जेवायला नाटकं करतात? १ ट्रिक वापरा; चपाती पुन्हा मागून खातील-पोटभर जेवतील

मुलं जेवायला नाटकं करतात? १ ट्रिक वापरा; चपाती पुन्हा मागून खातील-पोटभर जेवतील

How to Get Your Toddler To Eat Roti (Lahan mule jevat nasel tar kay karave) : मुलं चपाती  खात नसतील तर १ सोपी ट्रिक वापरल्यास मुलं पुन्हा पुन्हा चपाती मागून खातील आणि कधीच उपाशी राहणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 01:19 PM2024-01-12T13:19:52+5:302024-01-12T17:14:40+5:30

How to Get Your Toddler To Eat Roti (Lahan mule jevat nasel tar kay karave) : मुलं चपाती  खात नसतील तर १ सोपी ट्रिक वापरल्यास मुलं पुन्हा पुन्हा चपाती मागून खातील आणि कधीच उपाशी राहणार नाहीत

How to Get Your Toddler To Eat Roti : What Can You Do If Your Child Refuses To Eat Anything | मुलं जेवायला नाटकं करतात? १ ट्रिक वापरा; चपाती पुन्हा मागून खातील-पोटभर जेवतील

मुलं जेवायला नाटकं करतात? १ ट्रिक वापरा; चपाती पुन्हा मागून खातील-पोटभर जेवतील

लहान मुलांना जेवण भरवायचं म्हणजे सगळ्यात कठीण काम. १ ते २ तास मुलांच्या मागे फिरावं लागतं, त्यांच्या हातात फोन द्यावा लागतो तेव्हा कुठे मुलं जेवतात. (Best Parenting Tips) जर तुमच्या घरातही लहान मुलं असतील आणि चपाती खायला नाटकं करत असतील तर काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही मुलांना पोटभर जेवण खाऊ  घालू शकता. (What Can You Do If Your Child Refuses To Eat Anything) चपातीत पोषण मूल्य जास्त असतात. शरीराच्या चांगल्या विकासासाठी चपाती खाणं गरजेचं असतं. मुलं चपाती  खात नसतील तर १ सोपी ट्रिक वापरल्यास मुलं पुन्हा पुन्हा चपाती मागून खातील आणि कधीच उपाशी राहणार नाहीत. (How to Get Your Toddler To Eat Roti)

चपाती खायला नाक मुरडत असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी मिक्स व्हेज चपाती खायला देऊ शकता. यामुळे मुलांना भरपूर पोषण मिळेल. (Toddler Not Eating? Ideas And Tips) चपाती करण्यासाठी तुम्ही २ मार्गांचा अवलंब करू शकता. ज्यामुळे मुलं वारंवार मागून चपाती खातील. उरलेली भाजी किंवा डाळ घालून चपातीचे पीठ मळून घ्या. यात थोडं मीठ आणि जीरं घाला त्यानंतर चपाती करा. यामुळे मुलांना ही चपाती चवदार, चविष्ट लागेल.

दूध आवडत नाही पण कॅल्शियमचं काय? कॅल्शियम-व्हिटामीन D असणारे ५ पदार्थ- स्वस्त आणि पोषकही

मिक्स व्हेज चपाती करण्याची योग्य पद्धत (Healthy Roti-Mix Veg Chapati For Kids)

गव्हाच्या पीठात २ गाजर, १ मूळा किसून घाला, अर्धा कप शिजवून मॅश केलेले मटार, अर्धा कप पत्ताकोबी किसून घाला. त्यात थोडं आलं, हलकं मीठ आणि १ चमचा ओवा घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या. पीठ मळल्यानंतर पीठ थोडावेळासाठी तसंच ठेवून द्या.  नंतर या पीठाची चपाती करा. त्यात तुम्ही बटाट्याची सुकी भाजी आणि चिझ घालून फ्रॅकीसुद्धा बनवू शकता.

नाचोज, फ्रॅकी, रोल असे पदार्थ खायला मुलांना फार आवडते. थेट चपाती खायला देण्यापेक्षा तुम्ही पनीर रोल, बेसनाची पोळी, भाज्यांचे स्टफिंग घालून तयार केलेली चपाती मुलांना खायला देऊ शकता. काही मुलांना गूळ चपाती, दूध चपाती किंवा जॅमबरोबर चपाती खायला आवडते. ब्रेडऐवजी पोळीचा वापर करून तुम्ही हेल्दी सॅण्डविचही डब्याला देऊ शकता. 

मुलांना सतत रागवलं-ओरडलं तर ते पालकांचं ऐकतात? ‘हा’ घ्या खास मंत्र, रागवायची गरजच नाही

मुलांच्या खाण्यापिण्याची काळजी कशी घ्यावी? (What To do When Child Refuses To Eat Their Food)

मुलांना पोषण मिळावं यासाठी कधीच जबरदस्ती जेवण भरवू नका. यामुळे  खाऊनही त्याच्या अंगाला लागणार नाही. त्यांच्या आवडीचे पदार्थ करा किंवा भूक लागेल तेव्हा जेवायला द्या. मुलांना कोणतीही नवी चव आवडण्यास वेळ लागू शकतो. म्हणून जेवण्याच्या सुरूवातीला मुलांना ते काय खाताहेत ते समजण्यास वेळ द्या. मुलं स्वत:हून खायला तयार होत नसतील डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांची भूक वाढवण्यासाठी औषधं सुरू करा. जेणेकरून मुलं खाण्याकडे पूर्ण लक्ष देतील.

Web Title: How to Get Your Toddler To Eat Roti : What Can You Do If Your Child Refuses To Eat Anything

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.