Perfume Side Effects On Children: बाहेर कुठे जायचं असेल किंवा एखाद्या समारंभाला जायचं असेल तर पालक स्वत:ही कपड्यांवर परफ्यूम मारतात आणि लहान मुलांनाही लावून देतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, लहान मुलांच्या नाजूक त्वचेसाठी हे खूप नुकसानकारक असतं. कारण जास्तीत जास्त परफ्यूममध्ये 78% ते 95% डिनॅचर्ड अल्कोहोल, सिंथेटिक फ्रेगरेंस आणि फ्थेलेट्ससारखे केमिकल्स असतात. हे तत्वच्या आत शिरून ब्लडस्ट्रीमपर्यंत पोहोचतात. ज्यामुळे अॅलर्जी, खाज, रॅशेज किंवा श्वासासंबंधी समस्या होतात. परफ्यूममुळे इतरही काही घातक नुकसान होता ते पाहुयात.
चिमुकल्यांच्या फुप्फुसांवर प्रभाव
लहान मुलांची फुप्फुसं पूर्णपणे विकसित झालेली नसतात. जास्त गंध किंवा केमिकल बेस्ड परफ्यम त्यांच्या रेस्पिरेटरी सिस्टीमला प्रभावित करू शकतात. अनेक केसेसमध्ये डोकेदुखी, चक्कर येणे किंवा नाक बंद होणे यांसारख्या समस्या होतात.
बेबी परफ्यूम किती सुरक्षित?
आपणही अनेकदा बाजारात बेबी परफ्यूम पाहिले असतील. जे पूर्णपणे सुरक्षित नसतात. यांमध्येही आर्टिफिशियल फ्रॅगनंन्स आणि प्रिजर्वेटिव मिक्स केले जातात. त्यामुळे ते खरेदी करताना आधी निट बघा. शक्य असेल तर या परफ्यूमऐवजी नॅचरल पर्याय निवडा.
लहान मुलांच्या त्वचेच्या काळजीसाठी...
लहान मुलांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा खोबऱ्याचं तेल किंवा बदामाच्या तेलानं मालिश करा. वातावरणानुसार, मॉइश्चरायजर निवडा. कपडे धुण्यासाठी बेबी-सेफ पावडरचा वापर करा. नखे लहान आणि स्वच्छ ठेवा.